• Download App
    पंकजा मुंडेंच्या दुखऱ्या मनावर चंद्रकांतदादांची फुंकर; म्हणाले, मुंडेंच्या घरात जन्मलेल्या पंकजाताई बंड करणार नाहीत BJP state president chandrakantdada patil luads BJP national secretary pankaja munde for her sustained behaviour

    पंकजा मुंडेंच्या दुखऱ्या मनावर चंद्रकांतदादांची फुंकर; म्हणाले, मुंडेंच्या घरात जन्मलेल्या पंकजाताई बंड करणार नाहीत

    प्रतिनिधी

    मुंबई – भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या केंद्रीय मंत्रिपदाची महाराष्ट्रातल्या माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली. परंतु, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे दुखावल्या गेलेल्या भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्या दुखऱ्या मनावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी फुंकर घातली आहे. BJP state president chandrakantdada patil luads BJP national secretary pankaja munde for her sustained behaviour

    काल पंकजा मुंडे यांनी मुंबईत आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात महाभारत युध्दाचा उल्लेख करून ते आपण टाळत असल्याचे सांगितले होते. त्यावर चंद्रकांतदादांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    ते म्हणाले की एखाद्याला न्याय मिळाला, तर दुसऱ्यावर अन्याय होतोच. सर्वांना एकाच वेळी न्याय मिळू शकत नाही. डॉ. भागवत कराडांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद मिळाले. प्रीतम मुंडे यांना मिळाले नाही. कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण तसे घडले नाही.



    नारायण राणेंना मंत्रिपद मिळाले, रणजित निंबाळकरांना मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ जणांचे राजीनामे घेतले. ४० जणांना नव्याने निवडायचे होते. त्यामुळे असे घडले. त्यावर कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. पण यातून सावरणे हा समंजसपणा आहे. पंकजाताईंना तो काल दाखवला आहे. परिपक्वता दाखवून त्यांनी सर्वांना सांभाळून घेतले आहे, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांचे कौतुक केले.

    ते म्हणाले, की भाजप वाढवण्यात अनेकांचे योगदान आहे. मात्र, गोपीनाथ मुंडेंनी कार्यालयातील संघटना रस्त्यावर आणली. संघटनेला संघर्ष करायला शिकवले. त्यामुळे त्यांचे योगदान वेगळे आहे. अशा घरात जन्मलेल्या पंकजाताई कधीच बंडाचा विचार करणार नाहीत. एखादी गोष्ट आवडली नाही तर कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करण्याचा आधिकार आहे, अशी पुस्तीही चंद्रकांतदादांनी जोडली.

    BJP state president chandrakantdada patil luads BJP national secretary pankaja munde for her sustained behaviour

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!