• Download App
    ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा । BJP state president Chandrakant Patil has announced that he will help for the education of students from economically weaker families in the Brahmin community

    ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा

    पुरोहितांनी ई श्रम कार्ड योजनेसाठी नोंदणी करावी, त्याचा दीर्घकालीन लाभ होईल असेही पाटील म्हणाले. BJP state president Chandrakant Patil has announced that he will help for the education of students from economically weaker families in the Brahmin community


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिकच्या पुणे केंद्राच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन होते.यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.यावेळी ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या दृष्टीने ट्रस्ट स्थापन करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ह्या माध्यमातून गरजूना मदत दिली जाईल अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.



    तसेच ह्या ट्रस्ट साठी कायमस्वरूपी निधी संकलन करून त्यातील व्याजाच्या उत्पन्नाचा समाजहितासाठी विनियोग करता येईल, असे सांगतानाच मी ह्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देतो असेही पाटील यांनी जाहीर केले.तसेच पुरोहितांनी ई श्रम कार्ड योजनेसाठी नोंदणी करावी, त्याचा दीर्घकालीन लाभ होईल असेही पाटील म्हणाले.

    दिनदर्शिकेच्या प्रकाशन कार्यक्रमावेळी मकरंद माणकीकर,भाजप चे प्रवक्ते व संस्थेचे मार्गदर्शक संदीप खर्डेकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव ,उल्हास पाठक,शिरीष आठल्ये,माधव ताटके,सुवर्णा रिसबूड,पल्लवी गाडगीळ,अनंत खेडलेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

    BJP state president Chandrakant Patil has announced that he will help for the education of students from economically weaker families in the Brahmin community

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना