भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंचा उद्धव ठाकरेंना सवाल
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशाच्या नवीन संसद भवनाचे काल पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र या ऐतिहासिक सोहळ्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. ठाकरे गटानेही सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी आणि भाजपावर या पार्श्वभूमीवर टीका केली आहे. या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर दिले गेले. BJP spokesperson Keshav Upadhyes response to Thackeray group criticism
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, ‘’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेची इमारत स्वतःसाठी नाही बांधली. भारताच्या भविष्याचा विचार करून देशासाठीच बांधली आहे. एक ‘मातोश्री’ असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?’’
याशिवाय, ‘’संसद भवन उद्घाटनावेळी झालेले सगळे विधी आपल्या महान प्राचीन परंपरेचा अध्यात्मिक वारसा जपणारे होते. ‘सेंगोल’ची काठी करणाऱ्या लोकांना ते समजण्याची अपेक्षा नाहीच.’’ असा टोलाही लगावला.
याचबरोबर, ‘’घराणेशाही, एका कुटुंबाची सत्ता उलथून टाकल्याच्या रागातून टीका करणे योग्य नाही. घराणेशाहीला भाजपामध्ये थारा नाही. भाजपा म्हणजे एक कुटुंबाची मालकी नाही. तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे राजेशाही, हुकूमशाही ह्याबद्दल तुम्ही न बोललेलंच बरं. बाकी सामनामध्ये कितीही रेघोट्या मारल्या तरी जनतेच्या मनातली मोदींची प्रतिमेवर काहीच परिणाम होणार नाही.’’ असंही उपाध्ये म्हणाले आहेत.
BJP spokesperson Keshav Upadhyes response to Thackeray group criticism
महत्वाच्या बातम्या
- केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सावरकरांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- एर्दोगान पुन्हा एकदा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष, सलग अकराव्यांदा राज्याभिषेक होणार
- पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडून खेचून घ्यायचा राष्ट्रवादीचा चंग; अजितदादांचा आग्रह!!
- नव्या संसदेत सेंगोल, चाणक्य आणि अखंड भारताचा नकाशा; “कबुतरी शांती”ला फाटा देत गरुड झेपेची आशा!!