• Download App
    BMC Polls Seat Sharing: BJP To Contest 137 Seats, Shiv Sena 90 युतीचा मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटला; भाजप 137, शिवसेना 90 जागांवर लढणार; अमित साटम यांची घोषणा

    BMC Polls Seat : युतीचा मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटला; भाजप 137, शिवसेना 90 जागांवर लढणार; अमित साटम यांची घोषणा

    BMC Polls Seat

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : BMC Polls Seat गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत महायुतीने मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसाठी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी आज संयुक्तपणे या युतीची घोषणा केली. मुंबईत भाजपने आपल्याकडे अधिक जागा घेतल्या आहेत, तर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात शिवसेनेला झुकते माप देण्यात आले आहे.BMC Polls Seat

    मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकून शिवसेनेला (अविभाजित) जोरदार टक्कर दिली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत युती करताना जास्त जागा स्वत:कडे ठेवल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप निश्चित झाले आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांसाठी भाजप 137 जागा, तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे.BMC Polls Seat



    अमित साटम काय म्हणाले?

    भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले की, “यापूर्वी 207 जागांवर आमची चर्चा झाली होती, ती आता 227 पर्यंत पूर्ण झाली आहे. भाजप 137 आणि शिवसेना 90 जागांवर मैदानात उतरतील. आरपीआयसह इतर घटक पक्षांना या जागांमधूनच सामावून घेतले जाईल. कोणामध्येही नाराजी नाही, सर्वांना योग्य स्थान देण्यासाठी थोडा वेळ लागला.”

    मुंबईवर मराठीच महापौर

    माजी खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्ही सकारात्मक चर्चेतून हा सुवर्णमध्य काढला आहे. महायुती 150 पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबईवर आपलाच मराठी महापौर बसवेल. केंद्र आणि राज्यात आमची सत्ता असल्याने मुंबईचा विकास केवळ महायुतीच करू शकते, असा विश्वास मुंबईकरांना आहे. आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहोत.”

    रिपब्लिकन सेनेला किती जागा मिळणार? या प्रश्नावर बोलताना राहुल शेवाळे यांनी सांगितले की, घटक पक्षांना सामावून घेण्याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते आपापल्या कोट्यातून घेतील.

    ठाणे महानगरपालिका : शिंदे सेनेचे वर्चस्व

    मुंबईत जरी भाजप मोठा भाऊ असला, तरी ठाण्यात मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली ताकद कायम ठेवली आहे. ठाणे महापालिकेच्या 127 जागांपैकी शिवसेना 87 जागांवर, तर भाजप 40 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उपनमुख्यमंत्र्यांच्या प्रभावक्षेत्रात भाजपने सामंजस्याने घेतलेली ही भूमिका युतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

    BMC Polls Seat Sharing: BJP To Contest 137 Seats, Shiv Sena 90

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार काका – पुतण्यांची मजबुरीची युती; एकेक प्रभागात चार सक्षम उमेदवार देताना दोन्ही राष्ट्रवादींची दमछाक!!

    BMC Elections : काँग्रेसची BMC साठी 87 उमेदवारांची यादी जाहीर; जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न

    BJP Checks : भाजपचा ‘घराणेशाही’ला ब्रेक; महापालिकेत आमदार-खासदारांच्या मुलांना तिकीट नाही