विशेष प्रतिनिधी
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरसच्या मोहिते पाटलांनी भाजपच्या वरिष्ठांनी दिलजमाई केली आहे, पण त्यांनी ऐकलेच नाही तर त्यांच्याशिवाय पुढे जाण्याचीही पक्षाने जोरदार तयारी केली आहे. BJP seniors sympathize with Mohite Patil
मोहिते पाटील कुटुंबासोबत गेल्या 40 वर्षांपासून आम्ही कौटुंबिक संबंध ठेवून आहोत. मराठी माध्यमे काहीही म्हणत असली तरी अजून त्यांनी अधिकृतपणे तुतारी हातात घेतलेली नाही. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबासोबत अजूनही दिलजमाईचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जी टीम भाजप सोबत होती तीच टीम 2024 मध्येही निंबाळकर यांच्या सोबत आहे, असे भाजप नेते प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
मोहिते पाटील कोणता निर्णय घेणार?
खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूर तालुक्यातील 57 गावात जिल्हा परिषद गटानुसार प्रशांत परिचारक यांनी बैठक बोलावल्या होत्या. यावेळी परिचारक बोलत होते. परिचारक यांच्याकडे माढा , सोलापूर आणि सांगली या तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने दिलेली आहे. त्यामुळे परिचारक यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा मोहिते पाटील काय करणार??, खरंच पवारांबरोबर जाण्याची हिंमत दाखवून आपल्या राजकीय भवितव्य असे खेळणार का??, हा सवाल तयार झाला आहे.
मतांच्या संख्येत मोठी वाढ
माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 57 गावे असून जवळपास 150 बुथ आहेत. पंढरपूर तालुक्यातील दीड ते पावणेदोन लाख मतदान या तालुक्यात असल्याने आज खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दिवसभर या गावातील प्रश्न आणि अडचणी ऐकून घेतल्या. त्यावेळी निवडणुकीत भाजपसोबत फक्त शिवसेना होती. मात्र, आता राष्ट्रवादी आल्याने मतांच्या संख्येत मोठी वाढ होईल, असा दावाही रणजित सिंह निंबाळकर यांनी केला.
गेल्यावेळी निंबाळकर हे नवखे उमेदवार होते पण आता 5 वर्षात त्यांनी भरपूर काम करून नवनवीन कार्यकर्ते जोडले आहेत. त्यामुळे माढा लोकसभा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असे परिचारक यांनी सांगितले. नवीन माणसे जवळ येताना एकही जुना नेता अथवा कार्यकर्ता दूर जाऊ नये, असे भाजपचे प्रयत्न असल्याचे परिचारक यांनी सांगितले. पंढरपूर तालुक्यातील या गावांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या असून या मतदारांचा विश्वास प्रशांत परिचारक यांच्यावर आहे. ते आमचे निवडणूक प्रमुख असल्याने या भागातून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी व्यक्त केला.
BJP seniors sympathize with Mohite Patil
महत्वाच्या बातम्या
- राजकारणापायी पती-पत्नीची फाटाफूट, पत्नी काँग्रेसची आमदार, तर पतीला बसपची उमेदवारी मिळाल्यावर थाटला वेगळा संसार
- देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, मविआ असो की इंडिया आघाडी हे तुटलेले इंजिन, त्यांच्यावर जनतेचा विश्वासच नाही
- पीएम मोदींची मोठी घोषणा, तिसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांत मोठे निर्णय घेणार; 10 वर्षांत भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाई हा तर ट्रेलर
- ठाकरे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पवारांचा बारामतीतून भाजपवर निशाणा; मंत्रालयात जात नाही म्हणून ठपका ठेवलेल्या उद्धव ठाकरेंवर अफाट