प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने दणदणीत यश मिळवले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट या महाविकास आघाडीला त्यांनी जोरदार धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळी ट्विट करून ही माहिती दिली आहे. BJP number 1 by winning 2348 seats in gram panchayats
देवेंद्र फडणवीस यांची ट्विट अशी :
राज्यात पुन्हा एकदा भाजपा नंबर 1. ग्रामपंचायतीचे सुमारे 7000 निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. सर्वाधिक 2348 जागा जिंकून भाजपा पुन्हा एकदा क्रमांक 1 चा पक्ष बनला आहे आणि भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे दणदणीत यश मिळविल्याबद्दल आज त्यांचा सत्कार केला आणि भाजपा विधिमंडळ पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा केला. अजून सुमारे 700 जागांचे निकाल यायचे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला 842 जागांवर यश मिळाले असून भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मिळून 3190 जागांवर दणदणीत यश मिळाले आहे.
ठाकरे गटाला 637, काँग्रेसला 809 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1287 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कितीही पक्ष एकत्र आले तरी परिणाम काय असेल, हेच या निकालांनी दाखवून दिले आहे.
ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना एकत्रित या 2733 जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यापेक्षा या ग्रामपंचायत निवडणुकीत 500 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. 700 जागांचे निकाल अजून हाती यायचे आहेत.
BJP number 1 by winning 2348 seats in gram panchayats
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातल्या घरमालक नगरसेवकाने केली होती घृणास्पद मागणी; तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा
- दीपिकाची भगवी बिकिनी, दानिश अलींचे भगवे जॅकेट; शाहरुखच्या ‘पठाण’ समर्थनाचे नवे रॅकेट!
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवावा कसा?; वाचा ही महत्त्वाची माहिती!
- स्वातंत्र्य काँग्रेसने आणलं, तुमच्या घरातलं कुत्र तरी मेलं का?; मल्लिकार्जुन खर्गेंची घसरली जीभ