• Download App
    गनिमी काव्याने बैलगाडा शर्यत घेणारे पडळकर पुन्हा मैदानात!!; ठाकरे - पवार सरकारला केली 24 सप्टेंबरची आठवण|BJP MLC Gopichand Padalkar pitching for Bullock cart races in Maharashtra

    गनिमी काव्याने बैलगाडा शर्यत घेणारे पडळकर पुन्हा मैदानात!!; ठाकरे – पवार सरकारला केली 24 सप्टेंबरची आठवण

    प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या आदेशाविरोधात गनिमी काव्याने बैलगाडा शर्यत घेणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा याच विषयासाठी मैदानात उतरले आहेत. बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत ठाकरे – पवार सरकारने एक महिन्याच्या आता बैलगाडा शर्यती चालू होतील, असे सांगितले होते.BJP MLC Gopichand Padalkar pitching for Bullock cart races in Maharashtra

    त्यामुळे २४ सप्टेंबर रोजी बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे आणि ती झाली नाही, तर बैलगाडा मालकांसोबत बैठक घेऊन चर्चा करू आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवू आणि सरकार विरोधात संघर्ष सुरु करू, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.



    महिनाभरापूर्वी पडळकरांनी घेतलेली शर्यत!

    बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी याकरता राज्य शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात अपेक्षित युक्तीवाद होत नाही, असे कारण देत आमदार पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात गनिमी कावा करून भल्या पहाटे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.

    स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा विरोध डावलून या शर्यतीचे आयोजन झाले होते. त्यानंतर लगेचच पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारे यांनी बैठक घेतली. आणि राज्यातील बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देशी गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते.

    यासाठी बैलांचा सराव आणि शर्यत पुर्ववत सुरू करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले होते. मंत्रालयातील त्रिमुर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याविषयी आयोजित बैठकीत ते बोलले होते.

    घटनेचा आदर करुन शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या राज्यात बैलगाडा शर्यत सुरू आहे, त्यांचाही अभ्यास करण्यात येईल.

    तसेच याबाबत गरज भासल्यास नवीन कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचेही सुनील केदार म्हणाले होते. आता ही मुदत येत्या २४ सप्टेंबर रोजी संपणार आहे, त्यानंतरही शर्यत सुरू झाली नाही, तर पुन्हा संघर्ष सुरू करण्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे.

    BJP MLC Gopichand Padalkar pitching for Bullock cart races in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!