’काँग्रेसचे हात मुंबईच्या हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेले…असंही शेलार यांनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत बैठक होत आहे. यासाठी जवळपास २८ पक्षांची जमवाजमव करण्यात आली आहे. विरोधी आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा अद्याप निश्चित झालेला नाही, विविध पक्ष स्वत:चा नेता पंतप्रधान पदाचा उमेदवार असल्याचे सांगत आहेत. या दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाबाबत एक विधान केलं आहे. आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत, मात्र भाजपाकडे केवळ एकच चेहरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावर भाजपा आमदार आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. BJP MLA Ashish Shelars criticism of Uddhav Thackerays statement regarding the post of Prime Minister
आशिष शेलार पत्रकारपरिषदेत म्हणाले, ‘’उद्धव ठाकरे यांचे वाक्य म्हणजे देशासमोर होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका म्हणजे काही बालीशपणा आणि पोरखेळ वाटावा अशा पद्धतीचे आहे. आमच्याकडे म्हणे बरेच पंतप्रधान पदाचे उमदेवार आहेत, तुमच्याकडे एकच आहे. मग काय देश असा चालतो का? लोकशाहीमध्ये अशी व्यवस्था असेत का?’’
याचबरोबर ‘’जनतेला पहिल्या दिवसापासूनच आम्ही भ्रमित करायला निघालो आहोत, याची सार्वजनिक कबुलीच दिली जाते का? आम्ही पंतप्रधानपदी एक उमेदवार निवडू शकत नाही, याची मान्यता घेऊन निवडून दिलं जातं का? का घरात बसून राजकारण करण्याची सवय झाल्यामुळे वतनदारी आणि संजमशाहीप्रमाणे प्रत्येक विभागाला वेगळा पंतप्रधान ही कल्पना त्यांची आहे का? जगाचं नेतृत्व करायला निघालेला भारत देश, या देशाच्या बद्दलच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतकं बालीश आणि पोरखेळपणाचं वक्तव्य म्हणून हा पोरखेळ आहे..’’ असंही शेलार यांनी म्हटलं आहे.
तर मुंबईत होत असलेल्या विरोधकांच्या बैठकीवर निशाणा साधताना शेलारांनी म्हटले की, ‘’मुंबईत डरपोकांचा मेळावा “घमेंडीया” नावाने संपन्न होत आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला. ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या. अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे.’’
याशिवाय, ‘’महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे. फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना, महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!’’ अशा शब्दांमध्ये शेलारांनी टीका केली आहे.
‘’काँग्रेसचे हात मुंबईच्या हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेले… ९२ च्या दंगलीत विशिष्ट ठिकाणी काल्पनिक बॉम्ब असल्याचे सांगणारे नेते यांच्यासोबत उद्धव ठाकरे आज बसले आहेत. मुंबईकर बैठकीला जमलेल्या घमंडियांना ‘चले जाओ’ म्हणत आहेत.’’ असा घणाघात शेलारांनी पत्रकारपरिषदेत बोलताना केला आहे.
BJP MLA Ashish Shelars criticism of Uddhav Thackerays statement regarding the post of Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- विरोधी आघाडी I.N.D.I.A.ची आज मुंबईत तिसरी बैठक, जवळपास २८ पक्षांची जमवाजमव केल्याचा दावा
- मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे गंभीर आरोप, न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार; वकील जे लिहून नेतात, तोच निकाल येतो!!
- पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर अंतिम स्पर्धेसाठी नऊ संघांची घोषणा
- ‘मोदींशी लढण्याआधी आपापसातील भांडणं मिटवा…’ मुख्तार अब्बास नक्वींचा I.N.D.I.A आघाडीवर टोला