• Download App
    भाजपने मुख्यमंत्री केले नाही म्हणून राष्ट्रवादीच्या नाथाभाऊंना खंत; पण जळगावात नशिबी शिवसेनेच्या गुलाबरावांशी संघर्ष!!BJP lashes out at NCP's Nathabhau

    भाजपने मुख्यमंत्री केले नाही म्हणून राष्ट्रवादीच्या नाथाभाऊंना खंत; पण जळगावात नशिबी शिवसेनेच्या गुलाबरावांशी संघर्ष!!

    प्रतिनिधी

    जळगाव : भाजपने आपल्याला मुख्यमंत्री केले नाही याची सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या नाथाभाऊंना खंत आहे, पण जळगावात नशिबी मात्र शिवसेनेच्या गुलाबरावांशी संघर्ष आला आहे…!!BJP lashes out at NCP’s Nathabhau

    ही अवस्था आहे भाजपमधून राष्ट्रवादीत उतारवयात गेलेल्या एकनाथ खडसे यांची. एकनाथ खडसे यांनी किमान दोन-तीनदा तरी भाजपने आपला मुख्यमंत्रिपदाचा हक्क हिरावला. 40 वर्षे भाजपसाठी अक्षरशः हमाली केली. जळगाव जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये भाजप रुजवला. पण भाजपने उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची संधी येऊनही ती दिली नाही, अशी खंत नाथाभाऊंनी बोलून दाखवली आहे. यात त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना देखील ओढून घेतले आहे. मी त्यांना “टरबूजा” म्हणणार नाही, असे म्हणत टोचूनही घेतले आहे.

    मुख्यमंत्री पद न मिळाल्याची खंत नाथाभाऊंच्या शब्दा शब्दांमधून अनेक ठिकाणी व्यक्त होते.

    पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगणार्‍या नाथाभाऊंच्या नशिबी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यापासून स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या गुलाबरावांशी संघर्ष आला आहे. महाराष्ट्र पातळीवर जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असली तरी स्थानिक पातळीवरची लढाई नाथाभाऊ आणि गुलाबरावांना चुकलेली नाही. उलट ती अधिक तीव्र झाली आहे. नाथाभाऊंच्या बोदवडात गुलाबरावांनी भाजपबरोबर पाट लावून राष्ट्रवादीला धोबीपछाड दिल्यामुळे नाथाभाऊ आणि गुलाबराव मधला राजकीय संघर्षाचा भडका उडाला आहे.

    महा विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांच्या शेजारी खुर्चीला खुर्ची लावून बसतात पण जळगावात आले की ते जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये आणि नगरपालिकांमध्ये भाजपचे घरोबा करतात याची चीड नाथाभाऊंना आहे. त्यामुळे नाथाभाऊंनी गुलाबरावांशी आता पुरता पंगा घेऊन त्यांना संपवायचे ठरवले आहे. चारीमुंड्या चीत नाही केले तर पाटील नाव लावणार नाही, असे आव्हान गुलाबराव यांनी नाथाभाऊ नुकतेच दिले होते. त्यावर तुमचे नाव खराब आहे ते तुम्ही करून कधीच घेऊ नका, असा टोला नाथाभाऊंनी भुसावळ तालुक्यातील वरणगाव मध्ये गुलाबरावांना लगावाला आहे.

    मी शक्तिशाली आहे म्हणून तुम्हाला भाजप आणि काँग्रेसशी जुळवून घेऊन एकत्र यावे लागते, असेही त्यांना सुनावले आहे. परंतु, एकीकडे नाथाभाऊंच्या मनात मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा उसळत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र गुलाबराव पाटलांचा सारख्या शिवसेनेच्या मंत्र्याशी त्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसते.

    BJP lashes out at NCP’s Nathabhau

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!