विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आकडेवारी मांडून भाजपच्या यशाचे रहस्य उलगडून सांगितले. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. हे यश आमच्या कार्यकर्त्यांचे आहे, हा त्यांचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखविला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनात भाजपाने हे दणदणीत यश संपादन केले.BJP is number 1 in Maharashtra; Record by electing 129 mayors, 3325 corporators!!
आतापर्यंत (दुपारी 3.00) जे कल/निकाल आले, त्यात 2017 च्या 94 च्या तुलनेत यंदा भाजपने 129 नगरपालिकांवर (45 %) यश संपादन केले.
महायुती म्हणून 215 नगरपालिका (74.65 %) आम्ही जिंकल्या आहेत. (एकूण नगरपालिका : 288)
नगरसेवकांच्या जागांचा विचार केला तर 2017 ला भाजपाला 1602 जागा मिळाल्या होत्या, त्या आता 3325 (47.82 %) इतक्या झाल्या आहेत. म्हणजे दुपटीहून अधिक जागा भाजपाने जिंकल्या. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी 4331 जागा (62.30 %) जिंकल्या आहेत. (एकूण जागा : 6952)
महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात झालेली ही पहिली निवडणूक, मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. या निवडणुकीसाठी परिश्रम घेणारे माझे सहकारी नेते, कार्यकर्ते यांचेही अभिनंदन. आगामी महानगरपालिका निवडणुकीचा हा ट्रेलर आहे, याहून मोठे यश संपादन करण्यासाठी ताकदीने कामाला लागा, हेच आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो, असे फडणवीस म्हणाले.
BJP is number 1 in Maharashtra; Record by electing 129 mayors, 3325 corporators!!
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत स्वतंत्र, आघाडी इतरत्र; काँग्रेसच्या भूमिकेवरील संशय दूर; ठाकरे बंधूंच्या युतीत पवारांचा खोडा!!
- China Building : बांगलादेशात चीन उभारतोय एअरबेस आणि पाणबुडी तळ; संसदीय समितीचा अहवाल
- शालिनीताई पाटील : काँग्रेसच्या राजकीय वैभवशाली काळाच्या साक्षीदार हरपल्या!!
- पुणे, पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना आबा बागुल मात्र शिंदे सेनेत!!