विकसित महाराष्ट्रात एसटीचा कायापालट; सगळ्या बसगड्या 100 % ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेस संदर्भात बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई-बसेस संदर्भात बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज 7 महत्त्वाच्या निर्णयांवर आपली मोहोर उमटवली. यात सरकारने दिव्यांगांच्या शिक्षणाच्या सबलीकरणासाठी ठोस निर्णय घेतला असून, हरित महाराष्ट्र आयोगाचीही स्थापना केली आहे. सरकारने सामाजिक समता व समरसता वर्षानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृ्ती देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त आयोजित, ‘जावे विनोदाच्या गावा… उलगडूया अभिजात मराठी साहित्यातील विनोदाचे दालन’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये उद्योग आले पाहिजेत त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नांना उद्योजक सुद्धा प्रतिसाद देत आहेत ते महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत, पण काही घटक मात्र उद्योगांना त्रास देत असतील, तर त्यांना ठोकून काढू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
AI, इनोव्हेशन सिटी ते रायगड – पेण ग्रोथ कॉरिडॉर अशी आर्थिक प्रगतीची घोडदौड सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम 2026’मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी भारताच्या वतीने 10 राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे.
झ्युरिक मधल्या विवानचे देवेंद्र फडणवीस झाले फॅन; लाडक्या बहिणींबरोबरचा फोटो आणि व्हिडिओ केला शेअर!!, असे आज स्वित्झर्लंड मध्ये घडले.
महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आकडेवारी मांडून भाजपच्या यशाचे रहस्य उलगडून सांगितले. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. हे यश आमच्या कार्यकर्त्यांचे आहे, हा त्यांचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखविला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनात भाजपाने हे दणदणीत यश संपादन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारत संचार निगम लिमिटेडच्या स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कचे उदघाटन (ऑनलाईन) संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
देशात मोठ्या प्रमाणात काही राज्ये ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा कडवी डावी विचारसरणीग्रस्त आहेत. विचारांनी प्रेरित होऊन अनेक लोक हातात बंदूक घेऊन संविधानाने उभ्या केलेल्या व्यवस्थेविरुद्ध लढा उभारत आहेत. याच नक्षलवादाला आळा घालण्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार आपण जनसुरक्षा विधेयक आणल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात सरकारने राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले. या निर्णयांतर्गत सरकार सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मंत्रिमंडळाने धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 52,720 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.