Wednesday, 7 May 2025
  • Download App
    महाराष्ट्रात भाजपच नंबर 1; पण विरोधकांत राष्ट्रवादी, शिवसेनेला मागे सारून काँग्रेस नंबर 2!! BJP is number 1 in Maharashtra; But in the opposition NCP, Shiv Sena, Congress number 2!!

    महाराष्ट्रात भाजपच नंबर 1; पण विरोधकांत राष्ट्रवादी, शिवसेनेला मागे सारून काँग्रेस नंबर 2!!

    प्रतिनिधी

    पुणे : कर्नाटक निवडणुका नंतर काँग्रेसमध्ये आत्मविश्वास आला असला तरी महाराष्ट्रात मात्र भाजपच नंबर 1 आहे. पण विरोधकांमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मागे सारून काँग्रेसने दुसरा नंबर पटकावला आहे. BJP is number 1 in Maharashtra; But in the opposition NCP, Shiv Sena, Congress number 2!!

    सकाळ आणि सामच्या सर्व्हेत समोर आलेली आकडेवारी काँग्रेस साठी अच्छे दिन घेऊन आली आहे, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा ठाकरे गट मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा पोस्टर्स वर लागली असली तरी ते पक्ष मात्र बरेच पिछाडीवर गेले आहेत. सगळ्यात वाईट अवस्था शिंदे गटाची आहे. भाजपा बरोबर असूनही शिंदे गट पाचव्या नंबर वर फेकला गेला आहे.



     

    49,231 मतदारांनी भाग घेतलेल्या या सर्व्हेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट काँग्रेसच्या लोकप्रियतेने पुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र होत चालली आहे. शिवसेना देखील लोकसभेच्या 19 जागांवर आपला दावा सोडायला तयार नाही. पण या दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांचे दावे मतदारांनी मात्र खारीज केले आहेत. कारण हे नेते काँग्रेसला खालच्या क्रमांकावर ढकलत असताना प्रत्यक्षात मतदारांनी काँग्रेसला भाजपच्या टकरीत दुसऱ्या नंबर वर आणून ठेवले आहे.

    काँग्रेसने 19.9% मते मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या नंबर वर अर्थातच भाजप इतरांच्या तुलनेत बराच पुढे असून पक्षाला 33.8 % मतदारांची पसंती आहे. पण अडीच वर्षांमधला महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र फक्त 15.3 % मतदारांनी पसंती दिली आहे, तर ठाकरे गटाला 12.5 % मतदारांनी पसंती दर्शविली आहे. शिंदे गट फक्त 5.5 % मते मिळवू शकला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाची बेरीज केली तर 18 % मते मिळवून त्यांनी राष्ट्रवादीला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे.

    याचा अर्थ शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा राष्ट्रवादीला अजिबात झाला नसून तो फायदा काँग्रेसकडे वळल्याचे आकडेवारी सांगते. त्यामुळे शरद पवारांचा महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा प्रयोग तेवढ्याच पुरता यशस्वी झाला. त्या पलिकडे राष्ट्रवादीला फायदा झाला नाही आणि होण्याची शक्यता नाही हेच सकाळ आणि सामच्या सर्व्हेतील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

    BJP is number 1 in Maharashtra; But in the opposition NCP, Shiv Sena, Congress number 2!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!