• Download App
    BJP Slams Sanjay Raut Over Economy Remarks; "Modi is Capable," Says Navnath Banसंजय राऊतांवर भाजपचा पलटवार, अर्थव्यवस्थेची चिंता राऊतांनी करू नये, मोदी सक्षम, खरातप्रकरणी ठाकरेंना सहआरोपी करायचे का?

    Navnath Ban :संजय राऊतांवर भाजपचा पलटवार, अर्थव्यवस्थेची चिंता राऊतांनी करू नये, मोदी सक्षम, खरातप्रकरणी ठाकरेंना सहआरोपी करायचे का?

    Navnath Ban

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :Navnath Ban   देशाच्या अर्थव्सवस्थेचे आणि रुपयांचे काय होणार याची चिंता जनाब संजय राऊत यांनी करू नये. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करते, त्यामुळे पश्चिम बंगालमधील जनता आमच्यासोबत उभी राहील, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.Navnath Ban

    नवनाथ बन म्हणाले की, ज्या पद्धतीने मविआचे सरकार महाराष्ट्रात अडीच वर्षे अन्याय करत होते, त्यांच पद्धतीने पश्चिम बंगालमधील सरकार सर्वसामान्य लोकांवर अन्याय करते. त्यामुळे यावेळी तिथे आमचे सरकार येणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची अवस्था ही उबाठासारखी होणार आहे.Navnath Ban



     

    मंत्र्यांना सहआरोपी करा

    नवनाथ बन म्हणाले की, भोंदू बाबांना भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा अशी मागणी संजय राऊत करतात. हाच न्याय लावायचा असेल तर याच भोंदू बाबासाठी पायघड्या घालणारे मविआ सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहआरोपी करायचे का? कारण त्यांनी दुष्काळाच्या काळात लोकांना पाणी नसताना या भोंदू बाबासाठी जीआर काढत भोंदू बाबासाठी पाणी उपलब्ध केले. 2003 मध्ये जर भोंदू बाबावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर 15 वर्षांनी मविआचे सरकार आले त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते, तेव्हा या भोंदूबाबावर कारवाई करण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही. पण देवाभाऊंचे सरकार आल्यावर या भोंदू बाबावर कारवाई करण्यात आली आहे. मिलींद नार्वेकर, उद्धव ठाकरेंना सहआरोपी करायचे का? या प्रश्नाचे राऊतांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावे.

    ..म्हणून राऊत बैठकीपासून दूर

    नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे सामना जोरात सुरू आहे. यामुळेच आज उबाठा गटाच्या खासदारांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आलेली असताना राऊत त्या बैठकीपासून दूर राहत दांडी मारणे पसंत केले आहे. कारण राऊत VS आदित्य ठाकरे सामना जोरात सुरू आहे. हे सुरू असताना राऊत आमदार आणि खासदारांच्या निधीबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. उबाठा गटात सुद्धा दोन गट पडले आहेत.तुमची सत्ता असताना आमच्या 105 आमदारांना निधी देण्यात येत नव्हता. 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले त्यामुळे राऊतांनी निधीबद्दल बोलूच नये.

    BJP Slams Sanjay Raut Over Economy Remarks; “Modi is Capable,” Says Navnath Ban

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rupali Thombre : रूपाली ठोंबरे यांचा गंभीर आरोप- रूपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, अशोक खरातच्या विकृतीचा नवा व्हिडिओ

    नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसह 9 जणांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार; आज सभागृहात निरोप, 13 मे रोजी टर्म होणार पूर्ण