• Download App
    BJP fadnavis government has headache of NCP + Shivsena leaders than opponents महाराष्ट्रात भाजपच्या फडणवीस सरकारला

    महाराष्ट्रात भाजपच्या फडणवीस सरकारला विरोधकांपेक्षा महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांच्या कारनाम्यांची डोकेदुखी; जालीम उपायाची दिली पाहिजे गोळी!!

    BJP fadnavis

    नाशिक : महाराष्ट्रात भाजपच्या फडणवीस सरकारला विरोधी पक्षांपेक्षा महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांच्या कारनाम्यांची डोकेदुखी वाढली आहे. सरकारची प्रतिमा धोक्यात आली आहे. त्यामुळे केवळ या घटक पक्षांना सावरून घेण्यापेक्षा खरंतर जालीम उपाय योजनेची गोळी दिली पाहिजे आहे, तरच फडणवीस सरकारची जनमानसातील प्रतिमा टिकून राहण्याची शक्यता आहे.BJP fadnavis government has headache of NCP + Shivsena leaders than opponents

    महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आता विरोधी पक्षच उरलेला नाही. विरोधकांचे जे 49 आमदार विधानसभेत निवडून आले, त्यापैकी बहुतेक जण भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसायला बघत आहेत. अगदी उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे देखील आमदार केव्हाही फुटायला तयार आहेत, फक्त भाजपच्या नेतृत्वाने त्यांना इशारा करायचा अवकाश आहे.



    पण भाजप महायुतीकडे आधीच बहुमताचाच अतिरेक झाल्याने त्यांना इतर कुठल्या आमदारांची गरज नाही. पण म्हणून महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये सगळे आलबेला असल्याची स्थिती उरलेली नाही. कारण महायुतीतल्या घटक पक्षांनी विशेषतः घटक पक्षांच्या नेत्यांनीच आपल्या जुन्या – नव्या कारनाम्यांनी फडणवीस सरकारची बदनामी चालवली आहे. संतोष देशमुख – वाल्मीक कराड प्रकरणात “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडे पुरते अडकलेत आणि आता त्यांच्या फक्त राजीनाम्याची अधिकृत घोषणा व्हायची बाकी राहिली आहे. माणिकराव कोकाटे हे दुसरे “पवार संस्कारित” मंत्री बाहेरच्याच वाटेने निघाले आहेत. कारण त्यांना तर न्यायालयाने फसवणुकीच्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. केवळ तांत्रिक कारणामुळे सध्या त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद वाचले आहे.

    राष्ट्रवादीच्या “पवार संस्कारित” नेत्यांचे हे कारनामे कमी पडले म्हणून की, काय आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडखानीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचे कार्यकर्ते त्यात सापडलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे शेजारी उभे असताना विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते छेडखानीत सापडल्याचे उघडपणे सांगितले.

    त्यानंतर रक्षा खडसे यांचा त्यातल्या पियुष मोरे या आरोपीशी झालेला फोनवरचा संवाद व्हायरल झाला. त्यात त्यांनी उघडपणे तुम्ही फक्त आमदाराचे पाय चाटताय, पण तुम्हाला मुलींच्या छेडछाडी विषयी काही लाज वाटत नाही, अशा शब्दांमध्ये शिंदे सेनेचे वाभाडे काढले. मुक्ताईनगर मधल्या छेडखानीत तिथले शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी अनुज पाटील, किरण माळी या आरोपींचे एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरचे फोटो देखील व्हायरल झालेत. या सगळ्या आरोपींच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल होऊन त्यांना “पॉस्को” कायद्याची कलमे लागली आहेत.

    ही सगळी प्रकरणे कुठल्या विरोधी पक्षाची नाहीत, तर महायुतीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या कारनाम्यांची आहेत आणि त्याचीच डोकेदुखी भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारला वाढलेली आहे. म्हणूनच उपाययोजनाची जालीम गोळी देण्याची गरज आहे.

    BJP fadnavis government has headache of NCP + Shivsena leaders than opponents

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस