• Download App
    BJP Attacks Uddhav Thackeray Jitendra Awhad Sanatani Terrorism भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल-जितेंद्र आव्हाडांचा हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न मान्य आहे

    BJP Attacks Uddhav Thackeray : भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल-जितेंद्र आव्हाडांचा हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न मान्य आहे का? सनातनी दहशतवाद हा फेक नरेटिव्ह!

    BJP Attacks Uddhav Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : BJP Attacks Uddhav Thackeray  कथित सनातनी दहशतवादाच्या मुद्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचा शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुढे करून देशात सनातनी दहशतवादाचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? की त्यांनी आव्हाडांपुढेही गुडघे टेकलेत? अशी विचारणा भाजपने या प्रकरणी केली आहे.BJP Attacks Uddhav Thackeray

    मुंबई स्थित विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कथित सनातनी दहशतवादावर सडकून टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. केशव उपाध्ये म्हणाले, भगव्या दहशतवादाचा पेक नरेटिव्हचा कट कोर्टाने उधळून लावला. त्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी आहे. हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालील मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरवण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरवल्याचे स्पष्ट झाले आहे.BJP Attacks Uddhav Thackeray



    सनातनी दहशतवादाचा फेक नरेटिव्ह

    जितेंद्र आव्हाड सातत्याने हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आरोपांशी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे सहमत आहेत का? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटका झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दोषी ठरवून भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा काँग्रेस नेत्यांचा व शरद पवार यांचा कट कोर्टाने उधळवून लावला. त्यामुळे आता ते आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुढे करून सनातनी दहशतवादाचा फेक नरेटिव्ह पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सनातन धर्म हा भारताच्या प्राचीन सहिष्णु समाजव्यवस्थेची परंपरा आहे.

    सनातन ही देशाची संस्कृती

    महात्मा गांधींनी या परंपरेचे पालन करून सनातन धर्माचे आचरण केले. याचा काँग्रेसच्या लांगुलचालनवादी राजकारणाला विसर पडला आहे. सनातन ही देशाची संस्कृती आहे. या संस्कृतीने भारतीय समाजव्यवस्तेला सहिष्णुतेचे संस्कार दिलेत, असेही केशव उपाध्ये यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी यंग इंडियात प्रसिद्ध झालेल्या महात्मा गांधी यांच्या एका लेखाचा पुरावाच सादर केला. या लेखात गांधींनी मी स्वतः सनातनी हिंदू मानतो व वेद, उपनिषदे, पुराण व संपूर्ण हिंदी शास्त्रावर माझा विश्वास असल्याचे म्हटले होते, असे उपाध्ये म्हणाले.

    आव्हाडांची सनातन संस्कृतीवरील टीका मान्य आहे का?

    ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे जनतेला हिंदुत्वाचा बेगडी मुखवटा दाखवून आपल्याला हिंदुत्वाचा अभिमान असल्याचा दावा करतात. पण आता त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यापुढे गुडघे टेकले आहेत. काँग्रेसच्या संस्कृतीला शरण गेलेले ठाकरे आता मूग गिळून गप्प का आहेत? त्यांना आव्हाडांची सनातन संस्कृतीवरील टीका मान्य आहे का? सनातन संस्कृतीविरोधात गरळ ओकून अल्पसंख्यकांच्या भावना कुरवाळण्याचे काँग्रेस व शरद पवार गटाचे राजकारण सपशेल असताना ते आता जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडातून आपली मळमळ ओकण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या काँग्रेसी संस्कृती व त्याला शरण गेलेल्या उद्धव ठाकरेंचा आम्ही निषेध करतो, असेही उपाध्ये यावेळी बोलताना म्हणाले.

    BJP Attacks Uddhav Thackeray Jitendra Awhad Sanatani Terrorism

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !