भाजप आणि दोन्ही पवारांनी चालविलेल्या वेगवेगळ्या बेरजेच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या वजाबाकीचा धोका उद्भवला, इतकेच नाहीतर मतदारांना गृहीत धरल्याचा फटका सुद्धा बसू शकतो, याची शक्यता वाढल्याच्या खुणा आज दिसल्या.
– पुण्यात भाजपमध्ये 62 पक्षांतरे
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने बेरजेचे राजकारण करत इतर पक्षांमध्ये निवडून येण्याची क्षमता असलेले नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडले. भाजपने घाऊक पद्धतीने इतर पक्षांमधून कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये घेतले. पुण्यात भाजपने 62 पक्षांतरे घडवून आणली. त्यात त्यांनी पुंडांचाही समावेश केला. नाशिक मध्ये याच पद्धतीने बेरजेचे राजकारण करून गिरीश महाजनांनी शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष फोडले.
– राष्ट्रवादीतून कार्यकर्त्यांची वजाबाकी
दुसरीकडे पवार काका – पुतण्यांनी एकत्र येण्याचे बेरजेचे राजकारण केले. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते गरजेचे ठरले. पण हे बेरजेचे राजकारण साधताना भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीतून कार्यकर्त्यांची मात्र वजाबाकी झाली. पुण्यात आणि एकूणच राष्ट्रवादीत दोन तट उभे राहिले. प्रशांत जगताप आणि अमोल मिटकरी यांची लढाई जुंपली. सुप्रिया सुळे यांना अजित पवारांचे नेते धनंजय मुंडे नकोसे झाले.
– जोरगेवारांना चुकवावी लागली किंमत
चंद्रपुरात भाजपला सुधीर मुनगंटीवार यांना पटविण्यात यश आले पण त्यासाठी किशोर जोरगेवारांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती रद्द करावी लागली. सुधीर मुनगंटीवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपला त्यांच्यावर शिस्तभंगाचा बडगा उगारता आला नाही. मुनगंटीवार यांनी फडणवीस यांची भेट घेताच बंडाचे निशाण खाली ठेवले. पण त्याची किंमत इन्कमिंग केलेल्या किशोर जोरगेवारांना चुकवावी लागली. भाजपने किशोर जोरगेवारांना निवडणूक प्रमुख पदावरून हटविले.
- फडणवीस सरकारचा निर्णय; नगराध्यक्षांना नगरपरिषदां मध्ये सदस्यत्व आणि मताचाही अधिकार; नेमका अर्थ काय??
– नाशकात बेरजेचे राजकारण करताना दमछाक
नाशिक मध्ये सुद्धा गिरीश महाजन यांची बेरजेचे राजकारण करताना दमछाक झाली. त्यांना पक्ष कार्यालयाच्या समोरच स्वतःविरुद्ध घोषणाबाजी ऐकावी लागली. पक्षाच्या निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली, तरी देखील गिरीश महाजनांनी विनायक पांडे, दिनकर पाटील, यतीन वाघ, शाहू खैरे, नितीन भोसले यांचे पक्षप्रवेश घडवून आणले. भाजप मधल्या निष्ठावंत यांनी या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केला. हा विरोध नेतृत्वाला सहन करावा लागला.
– लोहा नगरपरिषदेतला धडा
वास्तविक लोहा नावाच्या नगरपरिषद भाजपला एक धडा मिळाला होता एकाच घरातल्या सहा कार्यकर्त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊन आपण लोहा नगरपरिषद जिंकू असा भाजपच्या नेत्यांचा होरा होता पण तो मतदारांनी हाणून पाडला भाजपने तिकीट दिले आणि कमळ चिन्ह असले म्हणून मतदारांनी घराणेशाहीतल्या उमेदवारांना मतदान केले नाही भाजपचे सूर्यवंशी घराण्यातले सहाच्या सहा उमेदवार मतदारांनी पाडले.
– धडा शिकायची नाही तयारी
या निवडणुकीने खरं म्हणजे सगळ्याच पक्षांना धडा शिकविला होता. परंतु महापालिका निवडणुकांचे गणित वेगळे आहे. तिथे बेरजेचे राजकारण चालेल. निवडून येण्याची क्षमता असलेले नेते आणि कार्यकर्ते पक्षात घेतले तर मतदारांची सुद्धा बेरीज होईल असा होरा भाजपच्या नेत्यांनी आणि राष्ट्रवादीच्या पवार काका कुठे यांनी बांधला. पण लोहा मधले चित्र वेगळेच सांगून गेले. मतदारांना गृहीत धरले तरी मतदार तसाच कौल देतील हे शक्य नाही हे लोह्याने दाखवून दिले. पण महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि पवार काका पुतणे हा धडा शिकले नाहीत हे आत्ता तरी सिद्ध झाले.
BJP and Pawar uncle nephew politics irritates workers
महत्वाच्या बातम्या
- K Kavitha : के. कविता यांची घोषणा- नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार; 2029ची विधानसभा निवडणूकही लढवणार
- सहा तास चर्चा करून सुद्धा सुप्रिया सुळे अपयशी; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादीचा राजीनामा!!
- फडणवीस सरकारचा निर्णय; नगराध्यक्षांना नगरपरिषदां मध्ये सदस्यत्व आणि मताचाही अधिकार; नेमका अर्थ काय??
- Jammu Kashmir : श्रीनगर ते जम्मू पर्यंत सुरक्षा, 80 गावांमध्ये घरोघरी तपासणी; घुसखोरी थांबवण्यासाठी काश्मीर पोलीस-सेनेचे संयुक्त अभियान