• Download App
    पक्षी निरीक्षण: रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद | Bird watching: Rankala Lake attracts bird lovers, recording 43 different species

    पक्षी निरीक्षण: रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद

     विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : सर्व्हाइव्हल हा आपल्या जगण्याचा मोटो आहेच. मग ह्याला पक्षी कसे अपवाद असतील? हजारो किलोमीटर चा प्रवास करून पक्षी स्थलांतरीत होतात. दरवर्षी हिवाळ्यामध्ये बरेच स्थलांतरित पक्षी कोल्हापूरमधील रंकाळा तलाव येथे आढळून येतात. रंकाळा तलाव परिसरात एकदिवसीय पक्षी निरीक्षणाची मोहीम नुकतीच राबवण्यात आली आहे.

    Bird watching: Rankala Lake attracts bird lovers, recording 43 different species

    वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि बर्ड्स ऑफ कोल्हापूर संस्थेतर्फे ह्या पक्षीनिरीक्षण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पक्षीनिरीक्षक डॉ सलीम अली यांची पुण्यतिथी आणि ज्येष्ठ वनरक्षक मारुती चितमपल्ली यांच्या जयंतीनिमित्त या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.


    इवल्याश्या पक्ष्यांचा हजारो किलोमीटरचा तुफान प्रवास


    पक्षीप्रेमींनी येथे एकूण 43 प्रजातींच्या पक्ष्यांची आतापर्यंत नोंद घेतली आहे. तर आठ प्रजातींच्या स्थलांतरित पक्ष्यांची नोंद देखील घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर यांनी या संदर्भात अधिक मार्गदर्शन केले आहे. लवकरच रंकाळा संवर्धन आणि जैवविविधता टिकवण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करत राहणार असल्याचे वायंगणकर यांनी यावेळी सांगितले आहे.

    Bird watching: Rankala Lake attracts bird lovers, recording 43 different species

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sanjay Shirsat : संजय शिरसाट पुन्हा टार्गेटवर, सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाचा निकाल 3 महिन्यांत; सुप्रीम कोर्टात 20 ऑगस्टला पुन्हा सुनावणी

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले- इंडिया आघाडीची बैठक लवकर व्हायला हवी; निवडणुका जवळ, बैठका आवश्यक