• Download App
    खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी दाखल सर्व गुन्हे मागे, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चीट|Big relief to MP Ravindra Vaikar, all cases filed in Jogeshwari plot scam dropped, Mumbai police gave clean cheat

    खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी दाखल सर्व गुन्हे मागे, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चीट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे (शिंदे गट) नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.Big relief to MP Ravindra Vaikar, all cases filed in Jogeshwari plot scam dropped, Mumbai police gave clean cheat



    जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी दाखल होता गुन्हा

    जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    वायकर यांच्यावरील सर्व गुन्हे मागे

    महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता अखेर वायकर यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

    Big relief to MP Ravindra Vaikar, all cases filed in Jogeshwari plot scam dropped, Mumbai police gave clean cheat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक