प्रतिनिधी
मुंबई : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीसाठी भरपाईचे 27 कोटी 18 लाख रुपये देण्यास शुक्रवारी महसूल व वन विभागाने मंजुरी दिली. या भरपाईचा लाभ कोकण व नागपूर विभागातील 41 हजार 476 शेतकऱ्यांना मिळणार आहे.Big relief to farmers, compensation approved for March bad weather; 27 crore 18 lakh rupees assistance announced to 4.14 lakh farmers
4 ते 8 मार्च आणि 16 ते 19 मार्च या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला होता. त्यामध्ये शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने महसूल आयुक्तांकडून त्यासंदर्भातले नुकसान भरपाईचे प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यास पात्र ठरवण्यात आले आहे.
नागपूर विभागात 10 हजार 178 शेतकरी, 6 हजार 353 हेक्टर पीक क्षेत्रास 11 कोटी 87 लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. कोकण विभागात 31 हजार 298 शेतकरी, 7 हजार 14 हेक्टर पीक क्षेत्रास 15 काेटी 31 लाख नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मार्चमधील या दोन महसूल विभागात एकुण 41 हजार 476 शेतकरी, 13 हजार 367 हेक्टर पीक क्षेत्रासाठी 27 कोटी 18 लाख रुपये मंजूर केले आहेत. 27 मार्च 2023 च्या सुधारित निकषानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सदर भरपाई देण्यात येते. अवेळी पाऊस ही राज्याने घोषित केलेली आपत्ती आहे.
Big relief to farmers, compensation approved for March bad weather; 27 crore 18 lakh rupees assistance announced to 4.14 lakh farmers
महत्वाच्या बातम्या
- सत्यपाल मलिकांना मिळालेल्या CBIच्या समन्सवर गृहमंत्री अमित शाहांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- … ही तर वरवरची मलमपट्टी: गांभीर्य असेल तर आरक्षण मर्यादेविषयी भूमिका स्पष्ट करा! अशोक चव्हाण
- … तेव्हा राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती का?; हिंदु जनजागृती समितीचा सवाल
- अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…