• Download App
    दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेत पक्षांतर्गत "ऑपरेशन"? अंतर्गत वर्तुळात मोठी चर्चा!! । Big political operation offing in shiv sena before Dasara rally

    दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेत पक्षांतर्गत “ऑपरेशन”? अंतर्गत वर्तुळात मोठी चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : 2021 चा शिवसेनेचा दसरा मेळावा बहुचर्चित ठरला आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी तर या मेळाव्याला आहेच, पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाची राजकीय घडामोडी दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेत “घडविण्यात” येण्याची चर्चा पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात सुरू आहे. Big political operation offing in shiv sena before Dasara rally

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेत एक मोठे ऑपरेशन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या सध्याच्या राजकीय भूमिकेबद्दल जाहीरपणे टीका टिप्पणी करणार्‍या नेत्यांवर कदाचित दसरा मेळाव्याला न बोलवून सुचक कारवाई करण्यात येईल, अशीही चर्चा आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, राज्यातले माजी मंत्री रामदास कदम तसेच सध्या ईडीच्या स्कॅनर खाली असणाऱ्या खासदार भावना गवळी आदी नेत्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा यात समावेश असू शकतो, अशी चर्चा आहे.



    शिवसेनेच्या सध्याच्या राजकीय धोरणाबाबत पक्षांतर्गत मोठी अस्वस्थता आहे. अनंत गीते यांनी रायगडच्या मेळाव्यात उघडपणे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर तोफ डागली आहे, तसेच रामदास कदम यांची देखील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या धोरणात्मक बाबींवर आणि काही वैयक्तिक टिका टिपणी आहे. भावना गवळी आणि त्यांचे काही सहकारी ईडीच्या चौकशी आणि तपासाच्या गर्तेत गुंतत चालले आहेत. शिवसेनेत अनेक आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विरोधात त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी नेल्या आहेत. शिवसेनेच्या एकूण प्रतिमेसाठी या बाबी राजकीय दृष्ट्या धोकादायक ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कदाचित एक “राजकीय ऑपरेशन” करतील, अशी शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा आहे.

    राज्याच्या महाविकास आघाडीचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून करत असताना आघाडी सरकारवर कोणतेही प्रश्नचिन्ह शिवसेनेतून लावले जाऊ नये हा पक्षाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर धोरणात्मक पातळीवर आपली स्वत:ची कृती आणि वक्तव्य अंतिम असेल यावर देखील उद्धव ठाकरे यांना मोहोर उमटवायची आहे. म्हणून पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना काही सूचक इशारे देण्याची कारवाई दसरा मेळाव्यापूर्वी करण्यात येण्याची शक्यताही शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात बोलली जात आहे.

    Big political operation offing in shiv sena before Dasara rally

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य