प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपने कोणत्या नेत्यांना उमेदवारी दिली?, यापेक्षा पंकजा मुंडे यांचे तिकीट भाजपने कापले याच्या बातम्या मराठी माध्यमांनी अधिक जोर लावून दिल्या आहेत. Big news in Marathi media that Pankaja Munde’s ticket was cut more than BJP candidates
भाजपने विधान परिषदेचे 5 उमेदवार जाहीर केले आहेत यामध्ये श्रीकांत भारतीय, माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे, प्रसाद लाड, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि महिला भाजप प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांचा समावेश आहे. भाजपने या नेत्यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी छोट्या दिल्या आहेत. परंतु, पंकजा मुंडे यांचे विधानपरिषदेच्या टिकीट कापल्याच्या बातम्या मात्र मोठ्या दिल्या आहेत. जणू काही पंकजा मुंडे यांनी विधान परिषद उमेदवारीसाठी खूप जोर लावला होता आणि तरी भाजपने यांचे तिकीट कापले, असा राजकीय आभास मराठी माध्यमे निर्माण करत आहेत.
– पंकजा मुंडे मध्य प्रदेशच्या प्रभारी
पंकजा मुंडे राष्ट्रीय सचिव असून सध्या मध्य प्रदेश भाजपच्या प्रभारी आहेत. मध्य प्रदेशची संघटनात्मक पातळीवरची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परळी मध्ये येऊन पंकजा मुंडे यांच्या संघटनात्मक कौशल्याची वाखाणणी केली आहे. परंतु, याकडे मराठी माध्यमांनी दुर्लक्ष करू पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी खूप जोर लावून उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी देणे टाळले, असा आभास निर्माण केला आहे.
प्रदेश पातळीवर पक्ष संघटनेने आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडे प्रयत्न केले होते. परंतु केंद्रीय नेतृत्वाचा पंकजा मुंडे यांच्या संदर्भातला निर्णय वेगळा आहे, असा खुलासा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप नेत्यांच्या उमेदवारांची घोषणा करताना केला आहे.
Big news in Marathi media that Pankaja Munde’s ticket was cut more than BJP candidates
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभा निवडणूक : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला ठाकरे – पवारांचे निमंत्रण नाही!!
- राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीचा एकजुटीचा नेट, पण दोन मतांमध्ये घट!!
- जाहिरातीवरून वाद : बॉडी स्प्रे ब्रँडने केली होती बलात्काराला चालना देणारी जाहिरात, वाद सुरू झाल्यावर मागितली माफी
- राज्यसभा निवडणुकीची धास्ती आणि विधान परिषदेसाठी इच्छुकांची सर्वपक्षीय गर्दी!!