• Download App
    महाराष्ट्रात वीज दरात मोठी वाढ; पुढील 5 महिन्यांसाठी निर्णय!! Big increase in electricity rates in Maharashtra

    महाराष्ट्रात वीज दरात मोठी वाढ; पुढील 5 महिन्यांसाठी निर्णय!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात सत्ता बदल झाला असून शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार आल्यावर महावितरणने वीज दरात मोठी वाढ करून सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार प्रचंड वाढवला आहे. त्यामुळे याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. Big increase in electricity rates in Maharashtra

    कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला महाराष्ट्र MERC यांची परवानगी असते. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पाच महिन्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सध्याचा  समायोजन आकार वाढवला आहे. जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट 25 पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.

    – दरवाढ नेमकी किती?

    – 0 ते 100 युनिट आधी 10 पैसे; आता 65 पैसे

    – 101 ते 300 युनिट आधी 20 पैसे; आता 1 रुपये 45 पैसे

    – 301 ते 500 युनिट आधी 25 पैसे; आता 2 रुपये 05 पैसे

    – 501 युनिटच्या वर आधी 25 पैसे; आता 2 रुपये 35 पैसे

    Big increase in electricity rates in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सगळ्या “डावांचे” “अडथळे” पार करत संपूर्ण पवार कुटुंबांच्या गैरहजेरीत सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी!!

    शरद पवारांचा “डाव” उधळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार; उपमुख्यमंत्री होणार (“मूळच्या पवार” नव्हे), तर “बाहेरून आलेल्या पवार”!!

    सुनेत्रा पवारांनी आपल्याला विचारलेच नाही, असे खुद्द शरद पवारांनी सांगितल्यानंतर पार्थ पवार गोविंद बागेत पवारांच्या भेटीला; पण त्याचवेळी पटेल आणि तटकरे मुंबईत सुनेत्रा पवारांच्या भेटीला!!