• Download App
    बिग बॉस फेम अभिनेत्री यशिका भीषण कार अपघातात गंभीर जखमी, तर मित्राचा जागीच मृत्यू । big boss actress yashika aanand injured in a car accident her friend bhavani died

    बिग बॉस फेम अभिनेत्री यशिका आनंद भीषण कार अपघातात गंभीर जखमी, तर मित्राचा जागीच मृत्यू

    Big Boss Actress Yashika Aanand : तमिळ बिग बॉसच्या माध्यमातून चर्चेत आलेली अभिनेत्री यशिका आनंदच्या कारचा अपघात झाला आहे. यशिकाला गंभीर दुखापत झाली आहे. तर तिचा मित्र वल्लीचेट्टी भवानी याचा जागीच मृत्यू झाला. big boss actress yashika aanand injured in a car accident her friend bhavani died


    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तमिळ बिग बॉसच्या माध्यमातून चर्चेत आलेली अभिनेत्री यशिका आनंदच्या कारचा अपघात झाला आहे. यशिकाला गंभीर दुखापत झाली आहे. तर तिचा मित्र वल्लीचेट्टी भवानी याचा जागीच मृत्यू झाला.

    प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ओव्हरस्पीड एसयूव्ही ईसीआर रोडवर जात होती. कार मध्यभागी धडकली आणि नंतर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडली. घटनेनंतर तेथे उपस्थित लोकांनी कारमधील जखमींना वाचवण्यासाठी धाव घेतली.

    यशिका रुग्णालयात दाखल

    याशिका असलेल्या कारमधून तीन जणांना बाहेर काढण्यात आले. तिघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर यशिकाचा मित्र वल्लीशेट्टी भवानी गाडीच्या आत अडकलेला होता. त्याला वाचवण्यासाठी मदतीची वाट पाहिली जात होती, पण दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला.

    पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी चेंगलपेट रुग्णालयात पाठविला आहे. वैद्यकीय चाचणी अहवालानंतरच गुन्हा नोंदविला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

    कोण आहे यशिका आनंद?

    यशिका आनंद तमिळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. इंस्टाग्राम मॉडेल बनल्यानंतर तिने अभिनयात नशीब आजमावले. 2016 मध्ये धुरुवंगल पाथिनारू या चित्रपटाने यशिकाला मोठा ब्रेक मिळाला. 2018 मध्ये ती बिग बॉस तमिळच्या सीझन 2 मध्ये दिसली.

    दिग्दर्शकावर शोषणाचा आरोप होता

    यशिकाची मीटू मोहिमेतही चर्चा झालेली आहे. 2018 मध्ये तिने स्वत:च्या शोषणाचा अनुभव सांगितला होता. यशिकाने खुलासा केला होता की, एका दिग्दर्शकाने तिला एका चित्रपटात कास्ट करण्याचे आमिष दाखवून लैंगिक सुखाची मागणी केली होती. यशिकाने नकार दिला आणि डायरेक्टरवर शोषणाचा आरोप केला.

    big boss actress yashika aanand injured in a car accident her friend bhavani died

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट