• Download App
    Bhujbal Questions Authenticity Kunbi Certificates भुजबळ यांनी व्यक्त केली शंका- आज जारी झालेली कुणबी प्रमाणपत्रं योग्य आहेत का?

    Bhujbal : भुजबळ यांनी व्यक्त केली शंका- आज जारी झालेली कुणबी प्रमाणपत्रं योग्य आहेत का? ती 2 सप्टेंबर आधी शोधली होती का?

    Bhujbal

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Bhujbal राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त केली आहे. आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र योग्य आहेत का? या प्रमाणपत्रांच्या नोंदी 2 सप्टेंबरपूर्वी शोधल्या होत्या का? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.Bhujbal

    मराठवाड्यात आज सर्वत्र मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात तेथील पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात लातूरमध्ये 2, हिंगोलीत 50, तर धाराशिवमध्ये 4, बीडमध्ये 5 उमेदवारांचा समावेश होता. यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. पण छगन भुजबळांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त करून त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भुजबळ याविषयी म्हणाले, मराठा समाजाला आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे आधीच शोधून ठेवली होती का? हे पहावे लागेल.Bhujbal



    आज दिलेली प्रमाणपत्रे 2 सप्टेंबरच्या आधी शोधली होती का? दिलेली पत्र योग्य आहेत का? ते तपासायला हवे. मंत्रिमंडळाच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितले होते की, चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र जारी केले तर त्यावर कारवाई होईल. त्याचा आम्हाला कोर्टात फायदा होईल. सदर प्रमाणपत्र चेक करून दिले असतील तर हरकत नाही. पण खोटी माहिती देऊन, चुकीच्या मार्गाने दिली असतील तर माझा विरोध आहे. माझा कोणत्याही समाजाला विरोध नाही. ही शासनाची समिती आहे. सर्वानी याविषयी आपली भूमिका मांडली आहे, असे भुजबळ म्हणाले.

    आत्ता पाहू कसे काढावे मराठा – कुणबी जात प्रमाणपत्र?

    मराठा – कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांत कार्यालयाकडे (एसडीओ) यांच्याकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर पडताळणीसाठी तो अर्ज स्थानिक समितीकडे पाठवला जाईल. ही समिती वंशावळ तपासणी करेल. तसेच जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी आदी दस्तऐवज तपासेल. या समितीचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रमाणपत्र देण्याचा अंतिम निर्णय घेतील. यासाठी शासनाने समिती सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रशिक्षणात जात प्रमाणपत्राच्या नियमावली, चौकशीची पद्धत, अहवाल तयार करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींचे मार्गदर्शन केले जाईल.

    Bhujbal Questions Authenticity Kunbi Certificates

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बीड-अहिल्यानगर रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण, आजचा दिवस श्रेयवादाचा नाही, तर आनंदाचा!

    Sharad Pawar : सामाजिक वीण दुबळी होता कामा नये, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; सरकारला रास्त तोडगा काढण्याचा दिला सल्ला

    Bhujbal : भुजबळांच्या अडचणीत वाढ; बेनामी मालमत्तेप्रकरणी कोर्टाकडून चौकशीचे आदेश, अंजली दमानियांकडून तक्रार दाखल