कोरोना संसर्गाने शहरी भागात कहर केला आहे. मात्र, ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून कोरोना संसर्गाची चैन ब्रेक करता येते याचा आदर्श नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने घालून दिला आहे. एकाच दिवशी ११९ ग्रामस्थ कोरोनाबाधित आढळल्याव गावाने केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या दीड महिन्यात येथे एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.
प्रतिनिधी
मुंबई : कोरोना संसर्गाने शहरी भागात कहर केला आहे. मात्र, ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून कोरोना संसर्गाची चैन ब्रेक करता येते याचा आदर्श नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने घालून दिला आहे. एकाच दिवशी ११९ ग्रामस्थ कोरोनाबाधित आढळल्याव गावाने केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या दीड महिन्यात येथे एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.
नांदेड जिल्ह्यातील भोसी गावची लोकसंख्या सहा हजार. एका लग्नसमारंभानंतर गावातील अनेक जण कोरोनाबाधित झाले. हे पाहून जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी पुढाकार घेऊन , ग्राम पंचायत आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने गावात आरोग्य शिबीर आयोजित केले.
रॅपिड अॅनटीजेन आणि आरटीपीसीआर कोरोना चाचण्या केल्या. त्यात तब्बल 119 गावकरी कोविड पॉझीटिव्ह निघाले. बाधित आढळलेल्या सर्व गावकºयांचा गावातील अन्य व्यक्तींशी संपर्क टाळून संसगार्ची ही चेन ब्रेक करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपापल्या शेतात 15 ते 17 दिवस विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले . शेतमजूर आणि स्वत:ची शेती नसलेल्या अन्य बाधितांची सोय देशमुख यांनी आपल्या शेतात एक 40 बाय 60 आकाराची शेड उभारून त्यात केली.
गावातील आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविका या दररोज या रुग्णांना भेट देऊन त्यांची विचारपूस करत असत. या रुग्णांना जेवण, आवश्यक ती औषधे आणि अन्य गरजेच्या वस्तू ग्रामसेवक आणि आरोग्य विभाग यांनी उपलब्ध करून दिल्या.गावकऱ्यांनी 15 ते 20 दिवस विलगीकरणात काढल्यानंतर आरोग्य तपासणी झाल्यानंतरच ते कोरोनामुक्त व्यक्ती म्हणून गावात परतले .
लक्ष्मीबाई अक्केमवाड आणि विशाल कल्याणकर या दोघा रुग्णांनी आपला विलगीकरणाचा अनुभव सांगत शेतात राहून संसगार्ची साखळी तोडल्यानेच गावातले इतर नागरिक बाधित होण्यापासून वाचले असे सांगितले. विशेष म्हणजे गावातील कुठल्याही रुग्णाला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले नाही. कोरोनाबाधित व्यक्तींना इतरांच्या संपर्कात येऊ न देणे , कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळणे एव्हढ्या साध्या उपायांच्या मदतीने पुरेशा आरोग्य सुविधा नसलेली गावेही कोरोना मुक्त होऊ शकतात असा विश्वास प्रकाश देशमुख भोसीकर यांनी व्यक्त केला.
भोसी गाव पूर्णपणे कोरोनातून मुक्त झालं असून गेल्या दिड महिन्यात गावात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण सापडला नाही. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी गावकरी , लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित समन्वयाचे चांगले उदाहरण असलेला हा भोसी पॅटर्न जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी राबविणार असल्याचे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- PMC Opinion Poll 2021 : पुणे महापालिकेत पुन्हा भाजपच्याच हाती कारभार, सत्ताबदलास पुणेकरांचा स्पष्ट नकार
- Worlds Largest Iceberg : जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटून वेगळा, दिल्लीपेक्षाही तिप्पट मोठे आकारमान
- होत्याचे नव्हते झाले, हिंमत देखील तुटली; चक्रीवादळावर अभिनेत्री दिव्या दत्ता यांना दुःख्र
- नागपुरातील भटक्या कुत्र्यांना दररोज चिकन बिर्याणीची मेजवानी ; कोरोनाच्या काळात भूतदयेचा उपक्रम
- रामभक्त कधीच खोटे बोलत नाही …जय श्री राम!