• Download App
    भिवंडी : राज्य परिवहन बस अडवून दगडफेक , बस चालकाला अटक ; प्रकरणाचा पुढील तपास सुरूBhiwandi: State transport bus blocked, stone pelted, bus driver arrested; Further investigation into the matter is underway

    भिवंडी : राज्य परिवहन बस अडवून दगडफेक , बस चालकाला अटक ; प्रकरणाचा पुढील तपास सुरू

    कल्याण आगारातून बस भिवंडीकडे जात असताना कोनगाव येथे ही घटना घडली.Bhiwandi: State transport bus blocked, stone pelted, bus driver arrested; Further investigation into the matter is underway


    विशेष प्रतिनिधी

    भिवंडी : राज्यभरातील एसटी कर्मचारी २७ ऑक्टोबरपासून राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.दरम्यान राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. पण विलिनिकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. हळूहळू एसटी आगारातून बसेस सुरू झाल्या आहेत.दरम्यान रविवारी कल्याण-भिवंडी मार्गावर पाच बसेस सुरू राहिल्या, अशी माहिती साळुंके यांनी दिली.

     



    यावेळी एका ३५ वर्षीय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस चालकाला ( बाळासाहेब खेडकर ) कोनगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याला राज्य परिवहन बस अडवून दगडफेक करून तोडफोड केल्याच्या तसेच बस अडवून बसखाली झोपणे या आरोपाखाली अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.कल्याण आगारातून बस भिवंडीकडे जात असताना कोनगाव येथे ही घटना घडली.

    यावेळी कोनगाव पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीडी पिंगळे यांनी सांगितले की ,आंदोलकांपैकी एक असलेल्या चालकाने बसची तोडफोड केली. आम्ही त्याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करणार आहोत. त्याच्यावर दगडफेक, तोडफोड, सरकारी सेवेत अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    Bhiwandi: State transport bus blocked, stone pelted, bus driver arrested; Further investigation into the matter is underway

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस