प्रतिनिधी
पंढरपूर : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी – भाजप उमेदवारांचे पारडे सारखे खाली – वर होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर असताना चौथ्या फेरीत भगीरथ भालकेंनी आघाडी घेतली आहे.bhagirath bhalke leading, samadhan awatade trailling in pandharpur
चौथ्या फेरीत भगीरथ भालकेंना ११९४१ मते मिळालीत. तर समाधान आवताडे ११३०३ मते मिळाली आहेत.भगीरथ भालकेंना वडिलांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळाल्याचे मानले जाते.
एकूण २ लाख ३२ हजार मतदान झाले आहे. त्यामुळे चौथ्या फेरीनंतरही चित्र स्थिर राहील हे सांगणे कठीण आहे. दोन्ही उमेदवारांचे पारडे सारखे खाली – वर जाताना दिसत आहे.
पंढरपूर शहर आणि मंगळवेढा शहर येथील मतमोजणीचे मोठे आकडे अजून समोर यायचे आहेत. ज्यात दोन्ही उमेदवारांची खऱ्या अर्थाने परीक्षा होणार आहे. पंढरपूर शहरात भाजप – परिचारक परिवाराचे वर्चस्व आहे.
मंगळवेढ्यात भालके परिवाराला मोठा पाठिंबा असल्याचे मानले जाते. दोन्ही शहरांमधील मतदान कोणाच्या पारड्यात किती प्रमाणात जाते, यावर भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांचे भवितव्य अवलंबून आहे. शैला गोडसे यांची बंडखोरी अजून तरी भालकेंसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसलेली नाही
bhagirath bhalke leading, samadhan awatade trailling in pandharpur
महत्वाच्या बातम्या
- सोनू सूदच्या ट्विटनंतर चीन जागेवर आला, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर रोखले नसल्याचा केला दावा
- महाराष्ट्र, दिल्लीचा अपवाद वगळता सर्वच राज्यांनी उभारले स्वत : चे ऑक्सिजन प्लॅँट
- हृदयरोग असलेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात
- West bengal assembly elections 2021 results analysis : ममतादीदी हरोत किंवा जिंकोत… त्या बंगालमधून बाहेर पडतील…?? निदान बंगाली अस्मितेचा इतिहास तरी तसे दर्शवत नाही…
- आयर्लंडपासून ते लक्झेम्बर्ग, जपानपर्यंत तब्बल ४० देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले
- Kerala assembly elections 2021 results analysis : दक्षिणेतले समुद्रतरण, केरळच्या कॉलेजमधले पुशअप्स काँग्रेसची political immunity वाढवतील की…