• Download App
    Eknath Shinde 58 BEST & Contractor Bus Drivers Dismissed Over Road Accidents VIDEOS अपघातांमुळे बेस्ट आणि कंत्राटदार कंपन्यांचे 58 बसचालक बडतर्फ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत माहिती

    Eknath Shinde :अपघातांमुळे बेस्ट आणि कंत्राटदार कंपन्यांचे 58 बसचालक बडतर्फ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत माहिती

    Eknath Shinde

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :Eknath Shinde  २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत रस्ते अपघातांमुळे बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट आणि सेवा कंत्राटदार कंपन्यांच्या एकूण ५८ चालकांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.Eknath Shinde

    एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात शिंदे म्हणाले की, अपघातांमुळे ६०३ चालकांना निलंबित केले आहे. याशिवाय, इतर कारणांसाठी ६३ चालकांना बडतर्फ तर ५७४ चालकांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात २७०० ते ३१०० बसेस आहेत.Eknath Shinde



    चालकांना प्रगत प्रशिक्षण

    अपघात टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बस चालकांसाठी प्रगत प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला आहे. तसेच, २०० चालकांना बस ड्रायव्हिंग सिम्युलेटर प्रणालीवर प्रशिक्षण दिले आहे. अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालकांच्या ड्रायव्हिंग पद्धतीची तपासणी केली जात आहे.

    विधानसभेत विश्वविजेत्या संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदाचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, सभागृहात भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. अभिमान वाटत आहे. भारतीय संघाने यंदाच्या टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत न्यूझिलंड संघाचा पराभव केला. 96 धावांनी विजय मिळवला. या विजयासह तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश बनला आहे. एवढेच नाही तर सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी करणारा पहिला देशही बनला आहे.

    लग्नाळू तरुणांचा प्रश्न विधानसभेत गाजला, आमदार प्रकाश सोळंकेंनी मांडली ग्रामीण भागातील व्यथा

    जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभेत एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. “ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या असून, लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागत आहे,” अशा शब्दांत सोळंके यांनी ग्रामीण तरुणांची व्यथा मांडली. या परिस्थितीमुळे फसवणुकीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले असून, सरकार यावर काय उपाययोजना करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी ग्रामीण समाजात निर्माण होत असलेल्या या गंभीर सामाजिक प्रश्नावर सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

    Eknath Shinde 58 BEST & Contractor Bus Drivers Dismissed Over Road Accidents VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या राष्ट्रवादीतून आत्या – भाच्याची “डबल गेम”; मल्लिकार्जुन खर्गेंशी भेट, पण दोघांनी दिली वेगवेगळी कारणे!!

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे पुन्हा आमदार होणे शिंदेसेनेच्या हातात; मेपूर्वी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक

    Avinash Jadhav : संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळा; मनसेच्या अविनाश जाधवांचा आरोप