• Download App
    बीड : पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच एकाने केला आत्मदहन प्रयत्न ; पोलिसांमुळे टळला अनर्थ|Beed: One attempted self-immolation in front of Guardian Minister Dhananjay Mundes; Disaster averted by police

    बीड : पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच एकाने केला आत्मदहन प्रयत्न ; पोलिसांमुळे टळला अनर्थ

    विनोद शेळके यांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले असून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.Beed: One attempted self-immolation in front of Guardian Minister Dhananjay Mundes; Disaster averted by police


    विशेष प्रतिनिधी

    बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला होता.विनोद शेळके असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.रस्त्याविषयी तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे.यावेळी पोलिसांनी विनोद शेळके यांना रोखल्याने अनर्थ टळला.

    बीडमधील पंचशीलनगरच्या अलीकडे झालेले रस्त्याचे काम दर्जाहीन असून तक्रार करूनही कारवाई होत नाही. यामुळे त्यांनी प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयी ध्वजारोहण समारंभ प्रसंगी अंगावर डिझेल ओतून घेतले.दरम्यान, विनोद शेळके यांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले असून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



    यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या आंदोलकाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.कोणताही रस्ता एका व्यक्तीसाठी नसतो, त्या रस्त्याची आम्ही चौकशी करू,अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

    Beed: One attempted self-immolation in front of Guardian Minister Dhananjay Mundes; Disaster averted by police

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!