• Download App
    तोकडे कपडे घातले म्हणून युवतींना मारहाण ; पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक प्रकार; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा । Beating young women for wearing shorts; The shocking insident in Pune; Crimes against six people, including three women

    तोकडे कपडे घातले म्हणून युवतींना मारहाण; पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक प्रकार; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील युवतींनी तोकडे कपडे परिधान केल्यामुळे शेरेबाजी करून त्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी खराडी भागातील एका सोसायटीत राहणाऱ्या तीन महिलांसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या दोन्ही युवती परराज्यातील आहेत. Beating young women for wearing shorts; The shocking insident in Pune; Crimes against six people, including three women



    अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ज्योती संजय येळे (रा. लेक्सीस सोसायटी, अनसूया पार्क, रक्षकनगर, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येळे यांची लेक्सीस सोसायटीत सदनिका आहे. माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करणाऱ्या तीन युवती येळे यांच्याकडे भाडे तत्त्वावर राहायला आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्व आरोपी याच सोसायटीत राहायला आहेत.

    सोसायटीत राहणाऱ्या युवती सोसायटीच्या आवारात तोकडी वस्त्रे परिधान करून ये-जा करतात. त्याचा रहिवाशांना त्रास होतो, अशी तक्रार पठारे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रात्री युवती राहत असलेल्या सदनिकेत सर्व आरोपी शिरले. त्यांनी युवतींना शिवीगाळ आणि मारहाणही केली तसेच मलाही धमकावले, असे येळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

    Beating young women for wearing shorts; The shocking insident in Pune; Crimes against six people, including three women

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!