विशेष प्रतिनिधी
बारामती : फडणवीस यांनी बारामतीत पवारांसमोर सांगितले गृहखात्याचा मीच “बॉस”; पण अजितदादांची मदत घेऊ कामांसाठी “खास”!!, असे आज बारामतीत खरंच घडले.Baramati, Fadnavis told Pawar that I am the “boss” of the Home Ministry; But we will take help from Ajitdad for “special” works!!
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयोजित केलेल्या नमो रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांचे व्यासपीठावरून जे भाषण झाले त्यामध्ये त्यांनी शरद पवारांसमोर अजित पवारांच्या तडफदार आणि गुणवत्ता पूर्ण कामांची स्तुती केली. तशीच कामे त्यांनी ग्रह खात्यासाठी करावेत असे आवाहन केले पण हे आवाहन करताना अजितदादांनी गृह खातेच मागितले, तर ते त्यांना देणार नाही ते आपल्याकडेच ठेवू आणि अजितदादांची खास गुणवत्ता पूर्ण कामासाठी मदत घेऊ, असा स्पष्ट खुलासा फडणवीस यांनी केला. या निमित्ताने त्यांनी शरद पवार अजित पवार यांच्या बारामतीत जाऊन आपणच महाराष्ट्रातले “बॉस” असल्याचे सिद्ध केले!!
बारामतीतल्या नमो रोजगार मेळाव्यात अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीत बांधणात आलेले अत्याधुनिक बस स्टँड, पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय आणि पोलिसांच्या निवासी इमारतींचं उद्घाटन करण्यात आले. एखाद्या कार्पोरेट ऑफिसमध्ये आल्याचा भास व्हावा असे पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशन बांधण्यात आलं आहे. पोलिसांच्या निवासी इमारतीही हायफाय बांधण्यात आल्या आहेत. अजितदादांच्या या कामांचे देवेंद्र फडणवीस यांनी तोंडभरून कौतुक केलं.
आता पोस्टिंगची मागणी वाढेल
अजितदादांनी हेवा वाटावं असं बस स्टँड बनवले आहे. पोलीस क्वॉर्टर, पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशनही बांधले आहे. एखाद्या कार्पोरेटचं ऑफिस वाटावे असे पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशन झाले आहे. पोलिसांची निवासस्थानेही तशाच पद्धतीने बांधण्यात आली आहे. त्यामुळे माझ्याकडे बारामतीलाच पोस्टिंग करा म्हणून मागणी वाढेल. बारामतीत चांगली निवासस्थाने आणि पोलीस स्टेशन आहेत, त्यामुळे आम्हाला बारामतीला पाठवा, असा हेका पोलीस लावतील.
त्यामुळे मला असं वाटतंय, पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, त्या चांगल्या इमारती करण्यासाठी तुम्हालाच “पीएमसी” म्हणून नेमावे असे वाटते. त्यावर अजितदादा म्हणतील, पीएमसीच का? गृह खातेच माझ्याकडे द्या. मी चांगल्या इमारती बांधतो. पण दादा नाही, ते देणार नाही. गृह खाते मी माझ्याकडेच ठेवेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
फडणवीस यांच्या आखत्यारितील गृह खात्याअंतर्गत महाराष्ट्रात अनेक घोटाळ्यांच्या आणि कटकारस्थानांच्या चौकशा सुरू आहेत. त्या चौकशांचे कायदेशीर आणि राजकीय महत्त्व फार आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या गृह खाते आपल्याकडेच ठेवण्याच्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.
सर्वांना रोजगार मिळेल
आम्ही राजकारणातील लोकं कंत्राटी कामगार आहोत. दर पाच वर्षाने आम्हाला आमचं कंत्राट रिन्यू करावं लागतं. चांगलं काम केलं तर लोक आम्हाला संधी देतात आणि नाही केलं तर लोक घरी बसवतात. पण तुम्ही चांगलं काम केलं तर तुमची प्रगतीच होते. नागपूरला आपण मेळावा घेतला. 11 हजार लोकांना रोजगार मिळाला. त्यांना 50 हजाराचे पॅकेज मिळाले. 10 वी आणि 12 वी पर्यंत शिकलेल्या लोकांनाही रोजगाराची संधी मिळाली. या मेळाव्यासाठी अजितदादांनी खूप मेहनत केली. या रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे आहेत. पण 36 हजार अर्ज आले आहेत. उद्यापर्यंत आणखी अर्ज येतील, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.