• Download App
    बारामती-दौंड-पुणे बारामती मेमू रेल्वे ११ एप्रिलपासून रुळावर|Baramati-Daund-Pune Baramati Memu Railway on track from 11th April

    बारामती-दौंड-पुणे बारामती मेमू रेल्वे ११ एप्रिलपासून रुळावर

     

    पुणे : बारामती – दौंड – पुणे- बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) रेल्वेस मंजुरी मिळाली असून येत्या ११ एप्रिलपासून ही प्रत्यक्ष धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली.Baramati-Daund-Pune Baramati Memu Railway on track from 11th April

    पुणे ते बारामती दरम्यान ‘मेमू’ सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. याशिवाय प्रदूषणही कमी होऊ शकेल. पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची गेल्या काही दिवसांत आवश्यक ती कामे पूर्ण करून वाढविण्यात आली आहे. याशिवाय या मार्गाचे विद्युतीकरण देखील पूर्ण झाले आहे.



    खासदार सुप्रिया सुळे या गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे मंत्रालयाकडे यासाठी पाठपुरावा करत होत्या. अनेक वेळा त्यांनी त्यासाठी पत्र, निवेदने देण्याबरोबरच प्रत्यक्ष भेटी घेऊनही आपली मागणी मांडली होती. या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. बारामती-दौंड-पुणे मार्गावर मेमू प्रत्यक्ष धावण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत, अशी माहिती सुळे यांनी आज दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागाचेही त्यांनी आभार मानले आहेत.

    या पार्श्वभूमीवर ‘मेमू’ लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी खासदार सुळे या सातत्याने करत होत्या. अखेर आज रेल्वे विभागाकडून त्यांना संदेश देण्यात आला असून येत्या ११ एप्रिल २०२२ पासून या मार्गावर नियमितपणे मेमू धावणार असल्याचे त्यात कळविण्यात आल्याचे सुळे यांनी सांगितले.

    Baramati-Daund-Pune Baramati Memu Railway on track from 11th April

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस