• Download App
    Baramati Bypoll 2026: 55 Candidates in Fray; CM Fadnavis Backs Sunetra Pawar बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात तब्बल 55 उमेदवार; भाजप मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे उभा, CM देवेंद्र फडणवीसांचा शब्द

    CM Fadnavis : बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात तब्बल 55 उमेदवार; भाजप मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे उभा, CM देवेंद्र फडणवीसांचा शब्द

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    बारामती : CM Fadnavis अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल आणि सुनेत्रा पवार यांना सहानुभूतीचा लाभ मिळेल, असा महायुतीचा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत हा अंदाज पूर्णपणे फोल ठरला असून, या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 55 उमेदवारांनी उडी घेतल्याने लढतीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही पोटनिवडणूक आता अत्यंत चुरशीच्या आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.CM Fadnavis

    या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांच्या रूपाने धनगर समाजाचा उमेदवार रिंगणात उतरवून जातीय कार्ड खेळल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासमोरील आव्हान वाढले असून, ही लढाई आता अपेक्षेइतकी सोपी राहिलेली नाही. या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांना शब्दही दिला असल्याचे समजते.CM Fadnavis



    भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील- मुख्यमंत्री

    राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना सोबत घेऊन सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा महत्त्वाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर करण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करेल, अशी ग्वाहीदेखील फडणवीस यांनी या भेटीदरम्यान दिली.

    23 एप्रिल रोजी मतदान

    दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीचे राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि आता त्यांनी या रिक्त जागेवरून विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी 6 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 55 उमेदवार उतरल्याने लढत अत्यंत रंगतदार होणार आहे.

    पार्थ पवारांची कॉंग्रेसवर टीका

    दुसरीकडे, काँग्रेसने या मतदारसंघात आपला स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने पार्थ पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, ही काँग्रेसच्या डाऊनफॉल सुरुवात आहे, असे आक्रमक वक्तव्य केले आहे. पार्थ पवार यांच्या या विधानामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या टीका-प्रतिटीकांमुळे बारामतीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

    Baramati Bypoll 2026: 55 Candidates in Fray; CM Fadnavis Backs Sunetra Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड; भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!

    Nashik Godman Case : भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टाचा दणका; न्यायालयीन कोठडी; आज पुन्हा हजेरीचे आदेश; SIT ताबा घेणार

    Harshwardhan Sapkal : आम्ही बारामती निवडणुकीतून माघार घेतली नाही, काँग्रेसची स्पष्टोक्ती