वृत्तसंस्था
मुंबई : Anil Ambani स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ बडोद्यानेही दिवाळखोरीत गेलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि त्याचे माजी संचालक अनिल अंबानी यांना फ्रॉड घोषित केले आहे. आरकॉमने सांगितले की, त्यांना २ सप्टेंबर रोजी बँक ऑफ बडोदाकडून पत्र मिळाले, ज्यामध्ये कंपनी व अंबानी यांचे कर्ज खाते ‘फ्रॉड’ म्हणून घोषित करण्यात आले. बँकेने कंपनीला १,६०० कोटी रुपये व ८६२.५० कोटींची कर्जमर्यादा दिली होती. २८ ऑगस्टच्या स्थितीनुसार एकूण २,४६२.५० कोटींपैकी ₹१,६५६.०७ कोटी रुपये अजून थकीत आहेत. हे खाते ५ जून २०१७ पासून एनपीए म्हणून घोषित आहे. बँकेचे म्हणणे आहे की हा निर्णय फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टवर आधारित असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आहे.Anil Ambani
आरकॉमची सध्याची स्थिती
कंपनीवर एकूण कर्ज ₹४०,४०० कोटी (मार्च २०२५ पर्यंत) आहे. २०१९ पासून कंपनी नादारी व दिवाळखोरीच्या प्रक्रियेत आहे. अद्याप कोणतीही ठोस पुनर्रचना योजना एनसीएलटीकडून मंजूर झालेली नाही. एसबीआयच्या नेतृत्वाखालील कर्जदात्या समितीने २०२० मध्ये योजना मंजूर केली होती, परंतु प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे.Anil Ambani
प्रकरण १२ वर्षे जुने : आरकॉम
आरकॉम प्रवक्ता म्हणाला, हा प्रकार १२ वर्षांपूर्वीचा आहे. अनिल अंबानी २००६ ते २०१९ पर्यंत फक्त नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. त्यांचा कंपनीच्या दैनंदिन कामकाजाशी काहीही संबंध नव्हता. सर्व आरोप निराधार आहेत, आम्ही कायदेशीर पावले उचलू. दरम्यान, रिलायन्स पॉवरने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, रिलायन्स कम्युनिकेशन्सविरुद्ध बँक ऑफ बडोदाची कारवाई त्यांच्या व्यावसायिक कामकाजावर किंवा आर्थिक कामगिरीवर कोणताही परिणाम करणार नाही. अनिल साडेतीन वर्षांपासून रिलायन्स पॉवरच्या संचालक मंडळावर नाहीत.
Bank Of Baroda Declares Anil Ambani, RCom Fraud
महत्वाच्या बातम्या
-
- Ajit Pawar : महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर; माझ्यासाठी कायद्याचे राज्य महत्त्वाचे, अजितदादांची महिला IPS वादावर स्पष्टोक्ती
- Howard Lutnick अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा दावा केला!!
- West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभेत गदारोळ, भाजपचे मुख्य प्रतोद निलंबित; बाहेर जाण्यास नकार दिल्यावर मार्शलनी जबरदस्तीने काढले
- CM Siddaramaiah : CM सिद्धरामय्या यांचा राष्ट्रपतींना प्रश्न- तुम्हाला कन्नड येते का? भाजपचा पलटवार- सोनियांना विचारण्याची हिंमत आहे का?