• Download App
    आमदारांची पोरं, सुप्रिया सुळे,पंकजा मुंडे दारू पितात वक्तव्यावर बंडातात्या कराडकर यांनी मागितली माफी|Bandatatya Karadkar apologize forallegation that MLA's son, Supriya Sule, Pankaja Munde drinks alcohol

    आमदारांची पोरं, सुप्रिया सुळे,पंकजा मुंडे दारू पितात वक्तव्यावर बंडातात्या कराडकर यांनी मागितली माफी

    विशेष प्रतिनिधी

    इंदापूर : आमदारांची पोरं, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले होते. मात्र, आता आपल्या या वक्तव्यावर त्यांनी माफी मागितली आहे. ज्यांच्याबद्दल मी वक्तव्य केले आहे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे.Bandatatya Karadkar apologize forallegation that MLA’s son, Supriya Sule, Pankaja Munde drinks alcohol

    ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी माफी मागतो. त्यात कमीपणा कसला, अस कराडकर म्हणाले.हभप कराडकर म्हणाले, मी सकाळी विविध विषयांवर बोललो, पण तुम्ही फक्त तेवढेच दाखवले. तुम्ही पत्रकारांनी त्याचे भांडवल केले. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळे माहीत आहे



    आणि उभ्या महाराष्ट्रालाही माहिती आहे कोण दारू पिते. त्यात काही विशेष नाही. सरकार दारू प्या म्हणतेय, कारण सरकारला त्यामधून महसूल मिळतो.साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले,

    राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात याचे पुरावे देखील आहेत. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन रस्त्यावर नाचतानाचे फोटो देखील आहेत. फोटो शोधले तर नक्की सापडतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ढवळा असून अजित पवार पोवळा आहे. सगळे निर्णय अजित पवारच घेतात.

    सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला असून हा निर्णय दुदैर्वी आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी तो तातडीने मागे घेण्यात यावा या मागणीसाठी व्यसनमुक्त युवक संघ यांच्यावतीने आणि बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असे हातात लाकडी दांडू घेऊन दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनात वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. तसेच या सरकारने ऐकलं तर ठिक अन्यथा हातात घेतलेला दंडुका सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी दाखवण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

    Bandatatya Karadkar apologize forallegation that MLA’s son, Supriya Sule, Pankaja Munde drinks alcohol

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !