• Download App
    बुलढाण्यातील अभयारण्यात जंगल सफरीला बंदी, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्णय; पर्यटकांचा हिरमोड। Ban on jungle safaris due to corona infection

    बुलढाण्यातील अभयारण्यात जंगल सफरीला बंदी, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्णय; पर्यटकांचा हिरमोड

    विशेष प्रतिनिधी

    बुलढाणा : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. आता मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांनी १० जानेवारीला आदेश काढून जंगल सफारीवर बंदी आणली आहे. Ban on jungle safaris due to corona infection

    या निर्णयामुळे हिवाळ्यात जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्यांचा हिरमोड झाला. बुलढाणा जिल्ह्यात तीन अभयारण्य आहे. त्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा, लोणार यांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. विशेष म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्याकडे पर्यटकांचा कल वाढला आहे.

    या ठिकाणी धरणात बोटिंगची देखील व्यवस्था आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक बेरोजगार युवकांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला. मागील लॉकडाऊनमुळे सर्वजण हैराण होते. आता कोरोनाचा ओमिक्रोनचे संसर्ग प्रमाण अधिक वाढत असल्याने माणसामुळे वन्य प्राण्यात या विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत जंगल सफारीवर बंदी आणण्यात आली आहे.



    ज्योति बॅनर्जी , मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी १० जानेवारीला याबाबतचे आदेश काढल्याची माहिती वन्यजीव विभागाचे आरएफओ चेतन राठोड यांनी दिली आहे . कोणतीही पूर्वसूचना नसल्याने अचानक आलेल्या या आदेशामुळे ज्या पर्यटकांनी जंगल सफारीसाठी बुकिंग केली होती त्यांना ती करता आली नाही.

    • जंगल सफरीला कोरोनाची झळ
    •  बुलढाणा अभयारण्यात बंद करण्याचे आदेश
    •  ज्ञानगंगा, अंबाबारवा, लोणार ही अभयारण्य आहेत
    • हिवाळ्यात सफरीला येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड
    • वन्य प्राण्यांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आदेश

    Ban on jungle safaris due to corona infection

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!