वृत्तसंस्था
मुंबई : “राज्यात कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतरच यात्रा, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल”, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देखमुख यांनी स्पष्ट केलं आहे. Ban on cultural programs including yatras, fairs and tamasha in the state continue ; Will allow slowly : Cultural Affairs Minister Amit Dekhmukh
अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर आणि शिष्टमंडळाने या संदर्भात देशमुख यांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असा समज असताना पुन्हा कोरोनाचा फैलाव होत आहे. राज्यात रुग्णसंख्या घटल्यानंतर काही निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली होती. मात्र, सरकार सावध पावले टाकत आहे. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार नियमांमध्ये बदल केले जात आहेत.
अजूनही काही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू आहेत. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या इशाऱ्यानंतर करोनाबाबत उपाययोजना आखल्या जात आहेत. आता सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी यात्रा आणि जत्रांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगून हळूहळू यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देणार असल्याचे अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे रघुवीर खेडकर आणि शिष्टमंडळाला सांगितले.
– अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र
Ban on cultural programs including yatras, fairs and tamasha in the state continue ; Will allow slowly : Cultural Affairs Minister Amit Dekhmukh
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकांआधी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला, युवक शाखेच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा
- सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियमच्या नावांना केंद्राची मान्यता, 3 महिला न्यायाधीशांचा समावेश
- Bengal Post Poll Violence : सीबीआयने 9 केसेस नोंदवल्या; लवकरच तृणमूल नेते आणि कार्यकर्त्यांच्या चौकशीची शक्यता
- All Party Meeting : अफगाणिस्तानवर सर्वपक्षीय बैठकीत साडेतीन तास विचारमंथन; जयशंकर म्हणाले – परिस्थिती अद्याप ठीक नाही, 565 जणांना आणले
- पोलीस उपायुक्तासह दोन पोलीस निरिक्षकांवर खंडणीचा गुन्हा, फसवणुकीच्या गुन्ह्यात वाचविण्यासाठी मागितली १७ लाख रुपयांची खंडणी