• Download App
    अटक केल्याचा राग बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांना राहिला नाही,यांनाच का ? छगन भुजबळ यांचा शिवसेना आमदाराला सवाल|Balasaheb Thackeray's family is not angry about the arrest, why only him? Chhagan Bhujbal's question to Shiv Sena MLA

    अटक केल्याचा राग बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांना राहिला नाही,यांनाच का ? छगन भुजबळ यांचा शिवसेना आमदाराला सवाल

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबियांना राहिला नाही,यांनाच का ? असा सवाल नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर घाईघाईने घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा भुजबळ विरुद्ध शिवसेना संघर्ष नाही असेही त्यांनी सांगितले.Balasaheb Thackeray’s family is not angry about the arrest, why only him? Chhagan Bhujbal’s question to Shiv Sena MLA

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात आमची लढाई सुरू असल्याचे सांगत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणो त्यांनी केली आहे.यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ म्हणाले



    कांदे सेनेचे म्हणून सेना नेते त्यांच्यासोबत असावेत. राज्यात महाविकास आघाडी असतांना असे आरोप करणे योग्य नाही मी कोणालाही धमकी देत नाही मात्र विनंती जरूर करतो. माझ्याकडून या विषयाला पूर्णविराम देत आहे.

    भुजबळ म्हणाले, नांदगाव ला 45 कोटी निधी दिला. या वर्षीचा निधी कोरोना साठी वापरा हे सरकारचे निर्देश होते. निधी वाटप हा जिल्हाधिकारी समितीनं घेतला आहे. मी निधी वाटतो हा कांदे यांचा आरोप चुकीचा आहे.

    पालकमंत्री म्हणून सगळ्यांना समान वाटप करणं हे माझं काम आहे यासाठी न्यायालयात जाणे योग्य नाहीआपल्याला पालकमंत्री पदावरून हटवायचे असल्यास मुख्यमंत्र्यांना सांगा.ते शिवसेनेचे आहेत. मुख्यमंत्री हे सेनेचे आहे त्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना पटलं तर ते पालकमंत्री बदलतील

    Balasaheb Thackeray’s family is not angry about the arrest, why only him? Chhagan Bhujbal’s question to Shiv Sena MLA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा