• Download App
    हृदयशस्त्रक्रिया झालेल्या सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळलाBail plea of Sachin Waze rejected bu Court

    हृदयशस्त्रक्रिया झालेल्या सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळला

    वृत्तसंस्था

    मुंबई – अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने नामंजूर केला आहे. वाझेवर नुकतीच खासगी रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया झाली. Bail plea of Sachin Waze rejected bu Court

    त्यामुळे पुढील उपचार आणि देखभालीसाठी घरी नजरकैदेत राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज वाझेने केला होता. त्यावर विशेष न्या. ए. टी. वानखेडे यांच्या पुढे सुनावणी झाली. एनआयएच्या वतीने या अर्जाला विरोध करण्यात आला.
    वाझेवर सरकारी रुग्णालयात आणि कारागृहात योग्य ते उपचार केले जाऊ शकतात, तसेच त्याची देखभालही घेतली जाईल, असे एनआयएकडून सांगण्यात आले.

    न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि घरामध्ये नजरकैदेत ठेवण्याची मागणी अमान्य केली. वाझेला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात यावे आणि आवश्यकता वाटल्यास जे. जे. रुग्णालयात दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच घरचे जेवण देण्याची वाझेची मागणी न्यायालयाने मान्य केली.

    Bail plea of Sachin Waze rejected bu Court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !