• Download App
    संघर्षात मागे, पर्यटनात पुढे; राहुल गांधींचे वारसदार अयोध्येच्या दिशेने!! Back in conflict, ahead in tourism; Rahul Gandhi's successor towards Ayodhya

    Temple Run : संघर्षात मागे, पर्यटनात पुढे; राहुल गांधींचे वारसदार अयोध्येच्या दिशेने!!

    महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अखेरीस अयोध्या दौरा जाहीर झाला आहे. जाहीर करताना आधी आणि प्रत्यक्षात दौरा नंतर अशी शिवसेनेची स्थिती झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 5 जूनला अयोध्या दौरा आहे. त्याच्याआधी आदित्य ठाकरे शिवसेना आमदार – खासदारांसह दौरा करणार, असे संजय राऊत यांनी आधी जाहीर केले होते. पण आता मात्र अयोध्येचा दौरा जाहीर करताना त्यांनी 10 जूनची तारीख सांगितली आहे. याचा अर्थ राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर 5 दिवसांनी आदित्य ठाकरे अयोध्येत पोहोचणार आहेत. Back in conflict, ahead in tourism; Rahul Gandhi’s successor towards Ayodhya

    या काका-पुतण्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेनेने असली – नकली वाद सुरू केलाच आहे पण मधल्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी मात्र आपला अयोध्या दौरा उरकुन घेतला आहे. हे तिन्ही नेते एक प्रकारे “टेम्पल रन” करणाऱ्या राहुल गांधींचे वारसदार आहेत…!! “संघर्षात मागे आणि पर्यटनात पुढे”, असाच तो वारसा आहे.

    रामजन्मभूमी साठी हिंदुत्ववाद्यांनी जोरदार संघर्ष केला. त्यावेळी हे “पर्यटनकेंद्री नेते” त्या संघर्षात आघाडीवर नव्हते. पण आता तो संघर्ष यशस्वी झाला आहे. अयोध्येचे राम मंदिर 30 % पूर्ण होत आले आहे आणि आता सर्वच नेत्यांची पावले अयोध्येकडे वळताना दिसत आहेत. आपण किती रामभक्त आहोत हे दाखवण्याची त्यांच्यात चढाओढ लागली आहे…!!

    – राहुल गांधी जानवेधारी हिंदू

    राहुल गांधी जानवेधारी हिंदू बनले. बाकीचे सगळे बिन जानवेधारी पर्यटक आहेत. प्रत्येकाने आपापल्या दौऱ्याला धार्मिकतेचा रंग जरूर दिला आहे…!! पण या पर्यटन दौऱ्यातून राहुल गांधी काय… राज ठाकरे काय… आदित्य ठाकरे काय किंवा अगदी रोहित पवार काय या सगळ्यांचा “आयत्या पिठावर रेघोट्या” ओढण्याचा प्रकार मात्र लपून राहिलेला नाही…!!

    – रोहित पवारांच्या आयत्या पिठावर रेघोट्या

    राम मंदिराच्या संघर्षाच्या वेळी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे वयाने लहान होते. या दोघांचेही राजकीय पूर्वज खऱ्या अर्थाने एकमेकांचे विरोधक होते. प्रत्यक्ष अयोध्येच्या संघर्षाच्या काळात हे दोन्ही नेते नेमके कुठे होते…?? बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येच्या केसेस जरूर अंगावर घेतल्या. परंतु, प्रत्यक्षात ते अयोध्येला गेले नाहीत. शरद पवार तर थेट आयोध्य आंदोलनाचे ठाम विरोधकच आहेत. राम जन्मभूमीचे भूमिपूजन समारंभाने कशाला करायचे??, असा सवाल त्यांनी विचारला होता. पण त्यांचेच नातू अयोध्येत जाऊन राम भजनी लागले होते. हाच तो “आयत्या पिठावर रेघोट्या” मारण्याचा प्रकार आहे…!!

    त्या अर्थाने हे सर्वजण राहुल गांधींचे वारसदार आहेत. निवडणुका आल्या की राहुल गांधी हिंदू बनतात. मंदिरा – मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतात. काँग्रेसचे नेते त्यांना जानवेधारी हिंदू म्हणतात. निवडणूका संपल्या काँग्रेस दणकून पराभूत झाली, की राहुल गांधींचे हिंदूपणा देखील गळून पडतो आणि ते पुन्हा एकदा आपल्या जुन्या धर्मनिरपेक्षतेकडे वळतात.

    – राज ठाकरे अयोध्या संघर्षात मागेच

    राज ठाकरे आदित्य ठाकरे आणि विशेषत: रोहित पवार हे देखील याबाबतीत अपवाद ठरत नाहीत. राज ठाकरे यांनी भलेही आता हिंदुत्वाची भूमिका घेतली असो, अयोध्या संघर्षाच्या वेळी ते आघाडीवर नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांच्या हिंदुत्वावर असली – नकली चा शिक्का मारणारे देखील अयोध्या संघर्षांपुढे नव्हते ही वस्तुस्थिती आहे. “धर्मयात्रेचा” मुलामा देणाऱ्यांचा तर अयोध्या आंदोलनाची दूर दूर तक संबंधच नव्हता. उलट ते संघर्षपूर्ण आंदोलनाचे विरोधक होते…!!

    पण या सर्व प्रकारात एक बाब अधिक अधोरेखित होते, ती म्हणजे पंतप्रधान मोदींनी या सर्वांना आपल्या राजकीय अजेंड्यावर खेचून पुढे आणले आहे…!!… हे सगळे “पर्यटनी नेते” यानिमित्ताने एक्सपोज होत आहेत…!! याचा त्यांना निवडणुकीत फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची दाट शक्यता आहे…!!

    Back in conflict, ahead in tourism; Rahul Gandhi’s successor towards Ayodhya

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल