विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या अन्य 15 आमदारांची आमदारकी आज वाचली. त्यांच्या अपात्रतेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेला अर्ज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावला. हा अर्ज फेटाळून लावताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रामुख्याने निवडणूक आयोगाने मुख्य पक्ष कोणाचा हा दिलेला निकाल आणि त्याच बरोबर शिवसेनेची पक्ष घटना यांचा सर्वात महत्त्वाचा संदर्भ घेतला.Averted the so-called earthquake in Maharashtra; Chief Minister Eknath Shinde and 15 MLAs survived; Ubatha Shiv Sena’s application rejected!!
विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातला तथाकथित राजकीय भूकंप टाळला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवला नाही.
निवडणूक आयोगाने सर्व कायदेशीर बाबी तपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच्या शिवसेनेला मुख्य पक्ष म्हणून अधिमान्यता दिली. त्या पक्षाला शिवसेनेचे मूळ चिन्ह धनुष्यबाण देखील बहाल केले. त्यामुळे त्या पक्षाने नेमलेले भरत गोगावले विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवले. त्यांचे पक्षादेश विधानसभेच्या पटलावर वैध ठरवले.
त्याचबरोबर शिवसेनेची पक्ष घटना शिवसेनाप्रमुख हे पद मानते. शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी अथवा प्रतिनिधी सभा यांच्यात मतभेद झाले, तर शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी अथवा प्रतिनिधी सभा यांची इच्छा सर्वोपरी असते. त्यानुसारच मुख्य पक्ष हा एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने बहाल केला, ही बाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रामुख्याने अधोरेखित केली आणि त्यावर हुकूम शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा अर्ज फेटाळून लावला.
राज्याच्याच नव्हे तर देशासाठीही महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र ठरले आहेत. त्यामुळं राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसे थे आहे. यामुळे ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे.
निकालापूर्वी चेंबरमध्ये विधिमंडळ सचिव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा पार पडली. त्यानंतर नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले. तसेच ज्यांनी आपल्याला या कामात मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आणि त्यांच्या वकिलांचे देखील नार्वेकरांनी यावेळी आभार मानले.
आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० मिनिटांनी सुरुवात होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र या अपेक्षित वेळेपेक्षा ४५ मनिटे उशिरा नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले. त्यानंतर एक तासाहून अधिक काळ निकाल वाचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला.
शिंदेंच्या शिवसेनेवर खरा पक्ष म्हणून शिक्कामोर्तब
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष खरा असल्याने तसेच या शिवसेनेने नेमलेला व्हिप भरत गोगावले हेच अधिकृत व्हिप म्हणूनही त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असेही यावेळी नार्वेकर यांनी नमूद केले.
विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे.
Averted the so-called earthquake in Maharashtra; Chief Minister Eknath Shinde and 15 MLAs survived; Ubatha Shiv Sena’s application rejected!!
महत्वाच्या बातम्या
- मालदीवचे टुरिझम मार्केट आता तुम्हीच सुधारा; चीन धार्जिण्या अध्यक्षांनी टाकली चीनवरच जबाबदारी!!
- शाजापूरमध्ये अक्षत कलश यात्रेवर हल्लेखोरांची दगडफेक, परिसरात कलम 144 लागू
- खर्गे, ममता, पवारांची वक्तव्ये Off track; सौदी अरब अध्यक्षांसह मोदी On the Ram track!!
- भयानक : चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या स्टार्ट अपच्या CEOला बंगळुरुमध्ये अटक