Friday, 2 May 2025
  • Download App
    आमने-सामने : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची पंतप्रधानांवर टीका ; 'परफॉर्मन्सचा' पाढा वाचत भिडले भातखळकर । Atul Bhatkhalkar criticizes Prithviraj Chavan for mentioning to PM Narendra Modi as NPA

    आमने सामने : पृथ्वीराज चव्हाण मोदींना NPA म्हणाले; UPA च्या ‘परफॉर्मन्स’चा पाढा वाचत भिडले भातखळकर

    काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे बिनकामाची मालमत्ता असल्याचं म्हटलं. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार पलटवार केला .


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिनकामाची मालमत्ता असल्याचं ट्विट केलं. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्ला करत पृथ्वीराज यांना त्यांच्याकाळातील घोटाळा परफॉर्मन्सची आठवण करून दिली. Atul Bhatkhalkar criticizes Prithviraj Chavan for mentioning to PM Narendra Modi as NPA

    “महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले.

    UPAच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक ‘परफॉर्मन्स’ पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच”, असा टोला भातखळकर यांनी चव्हाणांना लगावला.

    चव्हाणांची मोदींवर टीका

    पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो ट्वीट केलाय. त्यावर देशातील सर्वात मोठे नॉन परफॉर्मिंग अॅसेट असं लिहिलेलं आहे. चव्हाण यांनी ट्वीट केलेला हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.

    Atul Bhatkhalkar criticizes Prithviraj Chavan for mentioning to PM Narendra Modi as NPA

    Related posts

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??

    Icon News Hub