• Download App
    मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान; जान मोहम्मदचे दाऊद गँगशी २० वर्षांपासून संबंध; एटीएसचा खुलासा!|Ats Chief Suspected Terrorist Arrested From Mumbai Dharavi Jan Mohammad Shaikh

    मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान; जान मोहम्मदचे दाऊद गँगशी २० वर्षांपासून संबंध; एटीएसचा खुलासा!

    प्रतिनिधी

    मुंबई : देशात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान रचणाऱ्या मुंबईच्या धारावी परिसरामध्ये राहणाऱ्या जान मोहम्मद अली मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उडाला. विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करताना “एटीएस झोपली होती का?”Ats Chief Suspected Terrorist Arrested From Mumbai Dharavi Jan Mohammad Shaikh

    असा सवाल केला असताना आता खुद्द एटीएस प्रमुखांनीच पत्रकार परिषद घेऊन त्याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी जान मोहम्मद शेखचे २० वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे.



    दिल्ली पोलिसांनी कारवाई करत एकूण ६ जणांना अटक केली असून त्यापैकी जान मोहम्मद शेख हा मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा होता. त्यामुळे राज्यातील तपास यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासंदर्भात एटीएसचे अतिरिक्त महासंचालक विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

    ९ तारखेला जान मोहम्मदचा

    • दिल्लीला जायचा डाव होता

    दिल्ली पोलिसांनी ६ लोकांना अटक केली आहे. त्यातला एक धारावीत राहणारा आहे. त्याचं नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख आहे. याला फार जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पाकिस्तानातील दाऊदच्या गँगसोबत संबंध असल्याचा त्याचा इतिहास आहे. मात्र, या प्रकरणाची माहिती आमच्याकडे नव्हती.

    ही माहिती दिल्ली पोलिसांना केंद्रीय एजन्सीनी दिली. ९ तारखेला त्यानं दिल्लीला जायचा ङाव होता. १० तारखेला त्यानं पैसे देखील ट्रान्सफर केले. पण त्याचं तिकीट कन्फर्म होत नव्हतं. मग १३ तारखेला गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनसाठी त्यानं वेटिंग तिकीट घेतलं. संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो एकटाच तिथून ट्रेनने निघाला. ट्रेन कोटाला पोहोचली, तेव्हा त्याला अटक करण्यात आली”, असं एटीएसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

     मुंबईत रेकी झालीच नाही

    “मुंबईत रेकी झालेली नाही. मुंबईत रेकी केली जाईल, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक माणूस आला आणि त्याने रेकी केली, ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. तो ट्रेनने जात होता, तेव्हाच त्याला अटक करण्यात आली आहे.

    दिल्ली पोलीस आणि आम्ही मिळून सर्व कारवाई करू, अशी माहिती देखील विनीत अगरवाल यांनी यावेळी दिली. जान मोहम्मदवर कर्ज होतं. आधी तो एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ती नोकरी सुटली. त्यानंतर त्याने कर्जाने एक टॅक्सी घेतलीच. त्याचा हफ्ता भरू न शकल्याने बँकेच्या लोकांनी टॅक्सी उचलून नेली.

    त्यानंतर त्याने पुन्हा कर्जावर एक टू व्हीलर खरेदी केली. त्यामुळे त्याला पैशांची गरज होती. त्यामुळेच कदाचित या कामासाठी त्याला संपर्क करण्यात आला असावा, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे, असं विनीत अगरवाल यांनी सांगितलं.

    त्याच्याकडे कोणतीही स्फोटकं, शस्त्र नाही मिळाली. जी काही माहिती आहे, ती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमचं एक पथक आज संध्याकाळी दिल्लीला जात आहे. जान मोहम्मदची चौकशी करेल. दिल्ली पोलीस आणि आमच्यात माहितीची देवाण-घेवाण होईल”, असं देखील अगरवाल यावेळी म्हणाले.

    Ats Chief Suspected Terrorist Arrested From Mumbai Dharavi Jan Mohammad Shaikh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!