वृत्तसंस्था
मुंबई : राज्य विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच सरकारला केली. त्यातून राज्यपाल आणि सरकार यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे. पण, विधानसभेच्या अध्यक्षांची निवड अनेक महिने होऊनही झालेली नाही. कारण सरकारने अधिवेशनच बोलावलेले नाही. दरम्यान, अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने घेण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आल्याचे वृत्त आहे.
Assembly Speaker election by voice voting!
कोरोना संक्रमण टाळण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावले जात नाही, असे सरकारकडून सांगितले जात आहे. परंतु, जनजीवन सुरळीत होत असताना लोकशाहीचे मंदिर असलेली विधानसभा मात्र अधिवेशनापासून दूरच आहे. दुसरीकडे राज्यातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, असे पत्र, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्यावरून नवा वाद सरकारने निर्माण केला आहे. दरम्यान, विधानसभा नियम समितीच्या बैठकीत अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव बुधवारी मंजूर केल्याचे वृत्त आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ११ सदस्यांपैकी ६ सदस्य बैठकीला उपस्थित होते. त्यात चार महाविकास आघाडीचे तर डॉ. संदीप धुर्वे व सुधीर गाडगीळ हे भाजपचे सदस्य उपस्थित होते. धुर्वे यांनी प्रस्तावाला विरोध दर्शविला. सत्तारुढ पक्षाला पराभवाची भीती वाटत असल्यानेच हा बदल केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. नियम समितीचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात सादर होईल. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद अनेक महिन्यांपासून रिक्तच आहे. काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्षपदी निवडले. त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर आता हिवाळी अधिवेशन तोंडावर आहे. सरकार ते केव्हा घेते याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.
Assembly Speaker election by voice voting!
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदाची बातमी : शनिवार वाडा अखेर पर्यटकांसाठी खुला; मराठी साम्राज्याचा वैभवशाली इतिहास पाहण्याची संधी
- पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल, क्वाड समिटमध्ये सहभागी होतील ; UNGA ला संबोधित करेल
- महाराष्ट्रात साकारला सिलिकॉनचा पहिला पुतळा, जिवंत माणसासारखा हुबेहूब; सांगलीत वडिलांच्या स्मरणार्थ मुलाने बनवला
- KBC १३ मध्ये सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ फ्लेक्स मसल, अमिताभ बच्चन झाले प्रभावित
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना जावेद अख्तरना भोवली; दिल्ली-मुंबईत फौजदारी गुन्हे दाखल