महाविकास आघाडीचे नाना काटे यांचा ३६ हजारांहून अधिक मताधिक्क्याने केला पराभव
प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपाने या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन केलं होतं. मात्र तरीही महाविकास आघाडीने आपल्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. अखेर मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल देत अश्विनी जगताप यांना भरघोस मतांनी विजयी केलं. Ashwini Jagtap of BJP won in Chinchwad Assembly by-election
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अश्विनी जगताप या आघाडीवर होत्या. मतमोजणीच्या ३७ फेऱ्या पार पडल्यानंतर अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मतं मिळाली होती. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मतं मिळाली. याशिवाय महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली. अश्विनी जगताप यांचा ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने विजय झाला.
Kasba By-Election Result : पुण्यातील कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली. निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन भाजपाकडून करण्यात आलं होतं. मात्र, मविआनं नाना काटेंना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक झाली.
चिंचवडमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदान झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटेंना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे नाराज होत राहुल कलाटेंनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याचाच फटका चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला बसल्याचे दिसत आहे.
Ashwini Jagtap of BJP won in Chinchwad Assembly by-election
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस आमदार सफिया जुबेर म्हणाल्या- आम्ही राम-कृष्णाचे वंशज : अमीन खान म्हणाले – भारत धर्मनिरपेक्ष मानले जात नाही, हिंदू राष्ट्रातही कोणी मारणार नाही
- केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींचे भाषण: म्हणाले- जिथे लोकशाही नाही, असे जग निर्माण होताना पाहू शकत नाही
- पाच वर्षांत ४७ वेळा पंतप्रधान मोदींचा ईशान्येस दौरा; आठ पैकी सहा राज्यांमध्ये भाजपाचे सरकार!