विशेष प्रतिनिधी
नाशिक : Ashok Kharat भोंदू अशोक खरातकडे एक नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक असल्याची बाब समोर आली आहे. हे चारही नंबर तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेषतः खरातने आपल्या जाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टरलाही ओढले होते. त्यांच्या मदतीने तो आपल्या जाळ्यात अडकणाऱ्या महिलांना गर्भपाताची औषधे देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे हे डॉक्टरही आता चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.Ashok Kharat
भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिकि शोषण केल्याचा आरोप आहे. सध्या तो नाशिक पोलिसांच्या कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पोलिस गत 5 तासांपासून त्याची झाडाझडती घेत आहेत. त्यात अनेक नवनवे खुलासे होत आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, अशोक खरात वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी 4 वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत होता. यातील एक क्रमांक तो केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. या नंबरवरून त्याचा काही राजकीय नेते व प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असावा असा संशय आहे.Ashok Kharat
दुसरा मोबाईल क्रमांकावरून तो आपले काही विशेष भक्त व महिलांशी संपर्क साधत होता. या नंबरवरून झालेल्या संभाषणांचा सध्या तपास सुरू आहे. तिसऱ्या मोबाईल क्रमांकावरून अशोक खरात आपले आर्थिक व्यवहार पाहत होता. या क्रमांकावरून झालेल्या संभाषणावरून त्याला मिळणाऱ्या देणग्या, पैशांचे व्यवहार व इतर आर्थिक देवाण – घेवाण यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अशोक खरात आपला चौथा मोबाईल क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेष तपास पथक या चारही मोबाईल क्रमांकांवरून झालेल्या संभाषणाची माहिती खंगाळून पाहत आहे. या प्रकरणी न्यायवैद्यक पथकाचीही मदत घेतली जात आहे.
महिलांना गर्भपाताची औषधी दिल्याचा संशय
उल्लेखनीय बाब म्हणजे अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. पण त्यापैकी एकही महिला गरोदर झाली नव्हती. त्यामुळे अशोक खरात महिलांना एखादी गर्भनिरोधक औषधी देत होता काय? या प्रश्नाचे उत्तर एसआयटी शोधत आहे. या प्रकरणी एसआयटी नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी करण्याचीही चौकशी आहे. हे डॉक्टर अशोक खरातच्या नियमित संपर्कात होते. एसआयटी या प्रकरणी बुधवारी कोर्टात एखादी नवी माहिती सादर करण्याची शक्यता आहे.
अशोक खरातला उद्या कोर्टात करणार हजर
अशोक खरातची उद्या बुधवारी पोलिस कोठडी संपणार आहे. त्यामुळे पोलिस त्याला उद्या कोर्टात हजर करणार आहे. त्यात ते पुन्हा त्याची कोठडी मागण्याची दाट शक्यता आहे. तूर्त पोलिस अशोक खरातच्या मोबाईलमधून रिकव्हर झालेल्या डेटाचा तपास करत आहेत. यात कॉल रेकॉर्ड्स व व्हॉट्सएप चॅट्सचा समावेश आहे. त्यातून अनेक नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
SIT Grills Ashok Kharat for 5 Hours; 4 Mobile Numbers for VIPs, Women Revealed
महत्वाच्या बातम्या
- विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांनाच नेता निवडा, असे शरद पवारांचे कोणीही नेते म्हटले नाहीत; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
- Telangana : तेलंगणामध्ये पॅरेंटल सपोर्ट बिल मंजूर; आई-वडिलांना निराधार सोडल्यास 15% पगार कपात
- NASA : 50 वर्षांनंतर नासाचे चंद्र मिशन; आर्टेमिस-2 मिशनची पहिली महिला असेल क्रिस्टीना; संघात 4 अंतराळवीर
- Trump : अमेरिकेची इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करण्याची तयारी; ट्रम्प 10 हजार अतिरिक्त सैनिक पाठवत आहेत