• Download App
    Fake IT Raids & Extortion: Ashok Kharat’s New Scam Exposed by Nashik SIT भोंदू खरातचा नवीन कारनामा उघड; भक्तांवर बोगस आयटी छापेमारी करायचा; सेटलमेंटच्या नावाखाली पैसे उकळायचा

    Ashok Kharat : भोंदू खरातचा नवीन कारनामा उघड; भक्तांवर बोगस आयटी छापेमारी करायचा; सेटलमेंटच्या नावाखाली पैसे उकळायचा

    Ashok Kharat

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : Ashok Kharat जादू-टोणा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचे एकामागून एक काळे कारनामे समोर येत आहेत. ‘एसआयटी’च्या तपासात आता खरातचा एक अत्यंत धक्कादायक ‘कांड’ उघड झाला असून, तो आपल्याच श्रीमंत भक्तांना लुटण्यासाठी चक्क ‘बोगस प्राप्तिकर (Income Tax) अधिकारी’ पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, त्याच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.Ashok Kharat

    भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत त्याच्यावर 13 गुन्हे दाखल झालेत. यातील 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे, 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे, तर एक गुन्हा ईडीने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा आहे. त्यातच आता आपल्या श्रीमंत भक्तांना चित्रपट स्टाईलने लुबाडल्याचे समोर आले आहे.Ashok Kharat



    बनावट छापेमारी करून भक्तांना लुटायचा

    अशोक खरात केवळ भोंदूगिरीच करत नव्हता, तर त्याने लुटीचे जाळे सर्वत्र पसरवले होते. आपल्याकडे येणारे मोठे उद्योजक आणि व्यावसायिक भक्त हेरून तो त्यांच्याकडे बनावट प्राप्तिकर अधिकारी पाठवायचा. संबंधित भक्त मोठ्या संकटात सापडला आहे, असे भासवले जायचे आणि त्यानंतर प्राप्तिकर विभागाची कारवाई टाळण्यासाठी ‘सेटलमेंट’च्या नावाखाली खरात त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा. या ‘बनावट रेड’मुळे अनेक उद्योजकांची मोठी फसवणूक झाली असून, आता हे भक्त पोलिसांत तक्रार करण्यासाठी पुढे येणार का, याकडे लक्ष लागले आहे.

    विकास दिवटे आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार

    सन २०२२ मध्ये शिर्डी संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी खरातच्या अडचणी वाढणार आहेत. तत्कालीन पोलिस तपासात खरातचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले होते. मात्र, आता विकास दिवटे यांच्या भावाने पुन्हा तक्रार केल्यानंतर शिर्डी पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाचा फेरतपास करण्यासाठी सरकारी वकिलांचा अभिप्राय मागवण्यात आला असून, लवकरच कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.

    तक्रारींचा आकडा १३ वर; एसआयटीकडून कसून चौकशी

    विशेष तपास पथकाने (SIT) खरातच्या कृत्यांचा पर्दाफाश करण्यासाठी स्थापन केलेल्या हेल्पलाईनवर तक्रारी येत आहेत. पती, मुले किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवून महिलांना अघोरी कृत्यांच्या जाळ्यात ओढले जायचे. आता आणखी ११ पीडित महिलांनी धैर्याने पुढे येत खरातवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. खरातविरुद्ध आतापर्यंत एकूण १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिला अत्याचाराचे ८, तर फसवणुकीचे ४ गुन्हे आहेत. एसआयटी या सर्व तक्रारींची सखोल शहानिशा करत आहे. तपासादरम्यान खरातची १०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचेही समोर आले असून, त्याचे आर्थिक व्यवहार एसआयटीच्या रडारवर आहेत.

    Fake IT Raids & Extortion: Ashok Kharat’s New Scam Exposed by Nashik SIT

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड; भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!

    Nashik Godman Case : भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टाचा दणका; न्यायालयीन कोठडी; आज पुन्हा हजेरीचे आदेश; SIT ताबा घेणार

    Harshwardhan Sapkal : आम्ही बारामती निवडणुकीतून माघार घेतली नाही, काँग्रेसची स्पष्टोक्ती