विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ashish Shelar भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयी सभेवर टीका केली आहे. तसेच हे केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेला कार्यक्रम असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.Ashish Shelar
आशिष शेलार ( Ashish Shelar ) म्हणाले, मराठी भाषा यावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर कालचा कार्यक्रम आणि त्यात झालेली भाषणे याला बघून मी एकच म्हणेल एकाचे भाषण अपूर्ण, दुसऱ्याचे भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव. ज्यावेळी मी अपूर्ण असे म्हणतो त्यावेळी जरूर एकाने मराठी विषयावरच राहण्याचा प्रयत्न केला, ही चांगली गोष्ट आहे. पण, मांडणी करताना मांडलेले मुद्दे विपर्यासाचे होते. या प्रत्येक मुद्द्याला मी खोडू शकतो, असे म्हणत आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली आहे.Ashish Shelar
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाल, त्रिभाषा सूत्र कधी आले, यांच्या गावातही ती माहिती नाही, कोणी आणली ती माहिती दिली ती भाषणात चुकीची. देशात अन्य कुठे त्रिभाषा आहे, हे साधे गूगल केले तरी सापडले असते. असे धादांत खोटे म्हणून अपूर्ण. मी प्रत्येक गोष्ट मांडू शकतो. दुसऱ्याचे भाषण अप्रासंगिक, विषय मराठीचा ते सोडून ट ला ट, फ ला फ आणि घ ला घ या पद्धतीचे टोमणेबाज भाषणाची परंपरा आणि केवळ उद्धवजींच्या भाषणात तर सत्ता गेल्याचा जो ससेहोलपटपणा होता तो दिसत होता, उद्विग्नता होती, तडफड होती. या पलीकडे काहीच नाही.
हा कार्यक्रमच अप्रासंगिक होता, असे आशिष शेलार म्हणाले. याचे कारण ना भाषेचा विषय, ना विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता. आणि म्हणून म महापालिकेचाच, म यांच्या महत्त्वाकांक्षेचा, राजनैतिक महत्त्वाकांक्षेचा विषय. याला राजनैतिक उत्तर आम्ही देऊ. ज्यांच्याकडे बोलायचे मुद्दे नसतात ते गुद्यावर येतात. ज्यांना आपली बाजू मांडण्यात कमतरता वाटते ते सामाजिक आणि जातीय वितुष्टीकरणाची भूमिका मांडतात. अणाजीपंत म्हणजे काय ? तुम्हाला नाव ठेवले तर राग येईल न. मग ठेवायची का नाव आम्ही? त्या दोघांबद्दल नाव ठेवायला आहेत.
आशिष शेलार म्हणाले, एकत्र येण्याचे श्रेय जर ते देवेंद्र फडणवीस यांना देत असतील तर माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद त्यांनाच मिळतील. दोघांच्याही भाषणात तकलादूपणा होता आणि अप्रामाणिकपणा होता. याचे कारण ते दोघेही प्रामाणिक असते तर त्यांना देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करावेच लागले असते. पहिल्या जीअर मधली हिंदी अनिवार्य अट देवेंद्र फडणवीस यांनी काढली. समजूतदारपणा हा मोठा भाऊच घेत असतो, त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी दूसरा जीअर मागे घेतला. मग का दोघे भाऊ देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत नाहीत? या दोघांचे हेतु केवळ राजकीय आहे. भाषेच्या विषयाशी त्यांना देणे-घेणे नाही.
आम्ही नाही तिसऱ्या भाषेला विरोध केला. विषय काय आहे त्रिभाषा सूत्राला विरोध काय आणि मुद्दा काय तुमची मुले कुठे शिकली. तुमची लेकरे ज्या शाळेत शिकली त्या बॉम्बे स्कॉटिश इंग्लिशच्या ऐवजी मुंबई स्कॉटिश इंग्लिश असे करा असे का नाही म्हणालात? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. बॉम्बेचे मुंबई करा असे का म्हटले गेले नाही? आपल्या लेकरांनी चांगले ते घ्यायचे आणि महाराष्ट्रातील बाकीच्या लेकरांना जाऊ द्या, काहीही शिकू द्या, असे आहे.
Ashish Shelar Criticizes Thackeray Brothers’ Rally
महत्वाच्या बातम्या
- PM Modi जी BRICS ट्रम्प मोडायला सांगत होते, त्याच BRICS मधून मोदींनी महासत्तांना सुनावले…
- Sri Lanka : श्रीलंकेने म्हटले- कोणत्याही किंमतीत कच्चाथीवू बेट सोडणार नाही; कायदेशीररीत्या ते आमचे
- पूर आला, पण भक्तीचा ओघ नाही थांबला; भर पावसातही गोदावरी मातेची महाआरती संपन्न
- Waqf Rules : वक्फ कायदा-केंद्राने नव्या नियमांची अधिसूचना जारी केली; सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन होणार