नाशिक : लांडगा आला रे आला म्हणून एकनाथ शिंदेंच्या हातून शिवसेना घेताहेत काढून हेच सत्य वकील असीम सरोदे यांच्या वक्तव्यातून समोर आले. पुढच्या महिन्यात शिवसेनेचा निकाल सुप्रीम कोर्टात लागतोय एकनाथ शिंदे यांच्या हातातून शिवसेना निसटते आहे त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार नाही, असा दावा असीम सरोदे यांनी केला.Aseem sarode claims Eknath Shinde will loose Shivsena and it’s symbol from supreme court
ज्या खटल्याची सुनावणी 19 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर पर्यंत होणार आहे, त्या खटल्याबद्दल असीम सरोदे यांनी आधीच भाकीत वर्तविले. जणू काही एकनाथ शिंदे यांच्या हातातून शिवसेना काढून घ्यायचा निर्णय न्यायमूर्ती सूर्यकांत हे असीम सरोदे यांनाच विचारून घेणार आहेत, अशी वातावरण निर्मिती सरोदे यांनी केली. सूर्यकांत यांच्या खंडपीठा समोरच्या खटल्यातून शिवसेनेच्या भवितव्याचा निकाल काय लागायचा तो लागो, पण अशी सरोदे यांच्यासारखे लिबरल लोक दोन शिवसेनेच्या आणि दोन राष्ट्रवादींच्या भांडणात नेहमीच ठाकरे आणि पवारांची बाजू घेत आलेत. त्यात त्यांनी कधी कुचराई केली नाही. पण म्हणून लोकांची बाजू न्यायालयाने उचलून धरली, असे कधी घडले नाही.
उल्हास बापटांच्या भाकितांचे काय झाले?
शिवसेना फुटून अडीच वर्षांचे सरकार निघून गेले. त्यानंतर नवे फडणवीस सरकार आले. दरम्यानच्या काळात घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी असंख्य दावे केले. शिंदे सरकार टिकणार नाही इथपासून ते उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा प्रस्थापित करावेच लागेल याचे हवाले दिले. परंतु प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टापासून भाजप पर्यंत सगळ्यांवर ठपके ठेवून झाले. पण महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती ते बदलू शकले नाहीत किंवा ती ठाकरे आणि पवार यांना अनुकूल करू शकले नाहीत. हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात त्यांना दणके बसलेच, कारण एकही निकाल बापट म्हणाले तसा लागला नाही, पण महाराष्ट्रातल्या जनतेने देखील उल्हास बापटांचे घटनात्मक युक्तिवाद आपापल्या घरातल्या भिंतींवरच्या खुंट्यांवर टांगून ठेवले.
मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये उल्हास बापट गप्प बसलेले दिसले. त्यांच्या ऐवजी आता असीम सरोदे उफाळून आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या हातातून शिवसेना काढून घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा हवाला दिला. पण ज्याची सुनावणी 19 ऑक्टोबर ते 15 सप्टेंबर दरम्यान होणार आहे त्याचा “निकाल” आधीच लावून आपली उतावळी भूमिका उघड्यावर आणली. लांडगा आला रे आला अशा थाटात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या हातातून शिवसेना परस्पर काढून घेतली!!
अर्थात हे सगळे होताना पुढचा महिनाभर एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते हातावर हात ठेवून गप्प बसतील, असा समज जर असीम सरोदे यांनी करून घेतला असेल, तर हरकत नाही. त्यांची लिबरल बुद्धी त्यांना लखलाभ असो!!
Aseem sarode claims Eknath Shinde will loose Shivsena and it’s symbol from supreme court
महत्वाच्या बातम्या
- पृथ्वीराज बाबांना झालंय काय??, ते एकदम सुशीलकुमार + चिदंबरम + दिग्विजय यांच्या रांगेत जाऊन का बसले??
- पृथ्वीराज चव्हाणांच्या सनातनी आतंकवाद या विधानावरुन प्रकाश महाजनांनी त्यांना सुनावले; शिंदे सेनाही आक्रमक
- मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाउन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!
- GST Collection जुलैमध्ये GST संकलन 1.96 लाख कोटी रुपये; गतवर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ; जूनमध्ये GST मधून 1.85 लाख कोटी