प्रतिनिधी
रायगड : कोकणात आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, आमदार, खासदार सर्वत्र भाजपचे साम्राज्य दिसेल इतर कोणत्याही पक्षाला स्थान नसेल, असा दृढ विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. कोकण जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पाली येथे ते सोमवारी बोलत होते. As soon as Ganpati reaches us, lotus will bloom in Konkan
अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर राणे याची कोकण जन आशीर्वाद यात्रेला सोमवारी सुरुवात झाली.
मंदिरे बंद असो अथवा सुरू, गणपती आम्हाला पावतो. राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभारावर सतत बोलणार, असे राणे म्हणाले. महाराष्ट्र व भारताचे नाव आपल्या कार्यकर्तृत्वाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले. प्रत्येक गोरगरीब, सामान्य घटकाला विविध योजनांतून सुख सुविधा देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे, असे राणे म्हणाले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांच्यासह बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड: धनंजय धारप व विश्वस्त मंडळाने राणे यांचा सत्कार केला.
नारायण राणे यांचा कोकणात झंझावात
नारायण राणे यांचा कोकणात झंझावाती दौरा सुरु झाला आहे. रायगड जिल्ह्यासह राज्यात जन आशीर्वाद यात्रेचे जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. यात्रा मुंबई ते सिंधुदुर्ग अशी मार्गक्रमण होत आहे. २६ ऑगस्टपर्यंत ही ‘जन आशीर्वाद’ यात्रा चालणार आहे.
२३ ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड जिल्हा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. पालीतील बल्लाळेश्वराच्या साक्षीने व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कोकण जन आशीर्वाद यात्रेला हिरवा कंदील दाखविला. यावेळी बल्लाळेश्वर मंदिर ते पालीतील शिवस्मारक अशी भव्य रॅली काढण्यात आली.
As soon as Ganpati reaches us, lotus will bloom in Konkan
महत्त्वाच्या बातम्या
- माजी पंतप्रधान देवेगौडा म्हणाले, राहुल गांधींचा लोकांवर परिणाम होतोय की नाही, कल्पना नाही
- Farmer Protest : NH-24 सुरू होणार की नाही, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, यूपी सरकारकडून शपथपत्र दाखल
- अयोध्येतील राम मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गाला कल्याण सिंहांचे नाव, यूपीच्या 5 जिल्ह्यांत असेल ‘कल्याण सिंह’ मार्ग
- जर तुमच्याकडेही असेल 2 रुपयांचे ‘हे’ नाणे तर तुम्ही घरी बसून बनू शकता लखपती